अमळनेर : – सध्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच अमळनेर शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. माझ्या मुलाचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी आहे, माझ्या मित्रानो आपण शक्य तेवढी मदत करावी, अशा भावनिक शब्दात चिठ्ठी लिहून बेरोजगार सिंधी इसमाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पैशाचा तगादा लावणाऱ्या दोन जणांची नावे देखील त्याने चिट्ठीत लिहिल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता सिंधी हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली.
दिनेश ठाकूरदास पंजवाणी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. तर जितेंद्र चौधरी (पारोळा) व रुग्णवाहिका चालक महेश सैंदाणे (रा. जानवे ता.अमळनेर) अशी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे आहेत. दिनेश पंजवाणी याने लिहिलेल्या चिट्ठीतील मजकूर असा “मैं दिनेश पंजवाणी अपने होश आवास मे लिख रहा हूँ. मैं बेरोजगार हो गया हूँ, मुझे कोई काम नही मिल रहा है और शर्म की बात है की मेरी बीबी काम करके घर चलायेगी, मुझे दो लोग पैसे के लिये बहोत तंग कर रहे है…जितू चौधरी महेश सैंदाणे ये लोग मुझे धमकी दे रहे है और मेरे पास घर चलानेको पैसे नही है ,ये दोनो को कहासे दु ,इसलिए तंग होकर मैं आत्महत्या कर रहा हूँ. ये दोनो के मोबाईल नंबर मेरे मोबाईल मे है….”
याचबरोबर, सुसाईड नोटच्या खाली मेरे जीएस ग्रुप के दोस्तो के लिए…माझे सर्व चड्डी मित्र आपल्याला माझी शेवटची कळकळीची विनंती आहे की, माझा मुलगा वरुण याचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी आहे. तरी आपल्या ग्रुपकडून शक्य तेवढी मदत करावी, असा उल्लेख त्यात आहे. दरम्यान, दिनेशच्या काकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम