वसंतवाडी येथे पोषण माह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी(सुमित पाटील)
जळगाव
: जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे दिनांक १४सप्टेंबर बुधवारी पोषण माह निमित्ताने वसंतवाडी अंगणवाडी कोड नंबर १०१८/१०१९यांनी विविध कार्यक्रम आयोजन केले होते यात स्वस्थ बालक स्पर्धा,पारंपरिक पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचा समावेश होतो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य प्रताप गुलाबराव पाटील हे होते तसेच जळगाव जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांचीही विशेष उपस्थिती होती त्याच बरोबर जळगाव पं.स.सदस्या सौ.निर्मला कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ चव्हाण सर, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी ( प्रभारी )भोई मॅडम, जळगाव तालुकाआत्मा समीतीचे अध्यक्ष पि.के.पाटील,

तालुका आत्मा समीती सदस्या सौ.निर्मला चव्हाण, हे.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सामाजिक कार्यकर्ते रविंद्रभाऊ कापडणेकर ,जिल्हा एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, म्हसावद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अग्रवाल सर, रेडिओ मनभावनचे केंद्र प्रमुख अमोल देशमुख, शिरसोली बिट पर्यवेक्षिका बोरसे मॅडम,विटनेरचे माजी सरपंच चावदस कोळी तसेच वसंतवाडी गावांचे लोकनियुक्त सरपंच सौ.वच्छलाताई पाटील, उपसरपंच श्रीमती सखुबाई पाटील,ग्रामपंचायत सदस्य गजमल पवार,सौ.अनिता चिमणकारे,सौ.प्रिती जगताप , जळके वि.का.सो.व्हाईस चेअरमन सुमनबाई चव्हाण, सदस्य आधार पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भास्कर सोनार तसेच मराठी शाळेचे शिक्षक सोमनाथ पाटील, संरक्षण अधिकारी महेंद्र बेलदार, सागर इंगळे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक वावडदा बिटच्या पर्यवेक्षिका अर्चना धामोरे मॅडम यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाली उपस्थित मान्यवरांचे झाडांचे रोपं व शाल देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी मांडणी केलेल्या आकार बालशिक्षण साहित्याची पाहणी केली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप पाटील व महिला बालकल्याण जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांनी साकारण्यात आलेल्या पोषण रथाचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले पुढे अंगणवाडीतील चार कोपऱ्यांची पाहणी केली

त्यात पहिला बौद्धिक कोपरा दुसरा वाचन कोपरा तिसरा कला कुसर व चौथा खेळ घर अशी मांडणी होती
आयोजित पारंपरिक पाककृती , रांगोळी स्पर्धेचे परीक्षण केले यांत पाककृती स्पर्धेत ३०महीलांनी सहभाग नोंदवला तर रांगोळी स्पर्धेत १५तरुणींनी सहभाग नोंदवला यात पाककृती स्पर्धेत अनुक्रमे सुमनबाई चव्हाण, जयश्री पाटील व सोनाली राठोड तर रांगोळी स्पर्धेत अनुक्रमे पुजा चव्हाण नंदिनी साखरे व दिव्या संतोष चव्हाण यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर स्वस्थ बालक स्पर्धेत तांडा येथील लतिका अंगणवाडीतील ६महीने ते ३वर्ष वयोगटातील मुला-मुलींना अनुक्रमे वैभव चव्हाण, नव्या चव्हाण व गौरी पवार,३वर्ष ते ५वर्ष वयोगटातील मुला-मुलींना अनुक्रमे यश चव्हाण, अंजली पवार व भगतसिंग राठोड आणि प्लांट येथील प्राजक्ता अंगणवाडीतील ६महीने ते ३वर्ष वयोगटातील मुला-मुलींना अनुक्रमे हिंदवी जगताप,शिवानी गावंडे व तेजवीर पाटील तसेच ३वर्ष ते ५वर्ष वयोगटातील मुला-मुलींना अनुक्रमे भावेस सोनार, जागृती तडवी व उज्वल भिल यांची निवड करुन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ चव्हाण व ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी उपस्थित जनसमुदायाला पोषण माह विषयी माहिती देऊन महत्व समजले त्यानंतर जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रविण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन आत्मा समीती अध्यक्ष पि.के.पाटील यांनी केले पोषण माह निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन हे वावडदा बिटच्या पर्यवेक्षिका अर्चना धामोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका उज्वला पाटील,कमल चव्हाण व मदतनीस निर्मलाबाई सोनार,भारती सोनार यांनी केले यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण व जळके वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन प्रविण पाटील सहकार्य केले

हे पण वाचा

टीम झुंजार