नवी दिल्ली : – सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हि़डीओ तुफान शेअर होत असतात. अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे. बिहारच्या बेगुसराय इथला धावत्या रेल्वेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वे प्रवाशांनी एका चोराला अघोरी शिक्षा दिली आहे. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल. या व्हायरल व्हिडिओवर कमेंट करताना नेटकऱ्यांनी संबंधीत प्रवाशांवर टीकास्त्र सोडलं आहे.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ट्रेनच्या बाहेर खिडकीला लटकताना दिसत आहे. आत बसलेल्या लोकांना तो हात सोडू नका अशी विनवणी करतोय. ट्रेनला लटकलेली व्यक्ती स्थानिक भाषेत म्हणत आहे की मला सोडू नका नाहीतर मी मरेन. ही घटना सोनपुर कटिहार येथील साहेबपूर कमाल स्टेशनची आहे. या ठिकाणी दोन चोर सत्यम कुमार नावाच्या प्रवाशाचा मोबाईल चोरून पळ काढत होते. परंतु एका चोराला पळून जाण्यात अपयश आलं.
पहा व्हिडिओ :
दरम्यान, दुसऱ्या चोराला प्रवाशांनी ट्रेनच्या खिडकीतून पकडून ठेवलं. याच दरम्यान ट्रेनही निघाली. धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल चोरणाऱ्या व्यक्तीला अनेक किलोमीटरपर्यंत असंच लटकवून नेण्यात आलं असंही म्हटलं जात आहे. हा १३ सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मी बेगुसरायपासून प्रवास करत होतो आणि खिडकीकडे बसून मोबाइलवर बोलत होता. यादरम्यान माझा मोबाईल हिसकावू घेतला, असं सत्यम कुमार या प्रवाशानं सांगितलं. तसंच त्यानं मोबाइल दुसऱ्या साथीदाराला दिला. त्याच्या दुसऱ्या साथीदाराला लोकांनी पकडलं आणि रेल्वे पोलिसांकडे दिलं, असंही तो म्हणाला.
हे वाचलंत का ?
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.