झुंजार । प्रतिनिधी पारोळा
शहरासह ग्रामीण भागात लम्पी आजाराने २२ गुरे बाधित झाले आहेत.परिणामी पशुपालक कमालीचे धास्तवले आहेत. ५ गुरे यशस्वी उपचाराने पूर्णपणे बरे देखोल झाले आहेत.गुरांसाठी १८ हजार लसी उपलब्ध झाल्या असून १० हजार २९७ लसी गुरांना टोचल्या गेल्या आहेत. पारोळा शहरासह ग्रामीण भागातील सुमारे २२ गुरे लम्पिने बाधित आढळले आहेत.त्यापैकी ५ गुरांवर यशस्वीपणे उपचार झाल्याने पूर्णपणे लम्पि आजारातून बरे झाले आहेत.
पारोळा, भिलाली,राजवड,पिंप्री प्र.अ.,धुळपिंप्री या गावातील गुरे बाधित आढळली आहेत.एकूण १७ गुरांवर सध्यास्तिथीत उपचार सुरू आहेत.गुरांवर उपचारसाठी प्रभावी असणारी लसीचा सुमारे १८ हजार लसी ५ इसी सेंटरसाठी उपलब्ध झाल्या आहेत.लसी टोचण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.१० हजार २९७ जनावरांना लसी टोचल्या गेल्या आहेत.उर्वरित लसी दोन दिवसांत टोचल्या जातील अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डाँ.सविता पिंनलवार यांनी “झुंजार न्यूजशी” बोलतांना दिली.
-पशुपालकांनो,अशी घ्या काळजी..
बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे, कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे, रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे, डास, गोचिड, तत्सम किड्यांचा बंदोबस्त करणे, तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे, रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारामध्ये नेण्यास प्रतिबंध करणे.
–लम्पिची अशी आहेत लक्षणे..
जनावरांच्या अंगावर 10 ते 20 मि.मी. व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस भरपूर ताप, डोळ्यातून नाकातून चिकट स्राव, चारा पाणी खाणे कमी अथवा बंद, दूध उत्पादन कमी, काही जनावरात पायावर सूज येणे व लंगडणे आदी लक्षणे दिसून येतात.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






