साधूंना जमावाकडून बेदम मारहाण, मुलं चोरल्याचा संशय, पालघर सारखी घटना थोडक्यात टळली

Spread the love

सांगली :-  जिल्ह्यात पालघरसारखी घटना घडली आहे. येथे मंगळवारी मूल चोरीच्या संशयावरून चार साधूंवर जमावाने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र, असे असूनही साधूंनी याबाबत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

ही घटना जत तालुक्यातील लवंगा गावातील आहे. उत्तर प्रदेशातील चार साधू कर्नाटकातील विजापूर येथून एका कारमधून पंढरपूरच्या मंदिराकडे जात होते. सोमवारी गावातील एका मंदिरात त्यांचा मुक्काम होता. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी प्रवास सुरू करताना त्यांनी एका मुलाला रस्ता विचारला होता.

मूल चोरीच्या संशयावरून साधूंना मारहाण

यामुळे काही स्थानिकांना ते मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय आला. अधिकाऱ्याने सांगितले की, ही बातमी गावात झपाट्याने पसरली आणि स्थानिक लोकांनी साधूंना काठ्यांनी मारहाण केली. त्यांनी सांगितले की पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि साधू उत्तर प्रदेशातील एका आखाड्याचा सदस्य असल्याचे सांगितले.

भाषा न समजल्याने आला संशय

स्थानिक लोकांशी बोलत असताना एकमेकांची भाषा न समजल्यामुळे या साधूंवर संशय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. यातून स्थानिक लोकांनी साधूंना बेदम मारहाण केली.

दरम्यान, महाराष्ट्रातील साधूंवर हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. 2020 मध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात 2 साधूंना जमावाने याच कारणासाठी बेदम मारहाण केली होती. ते साधू कारमध्ये बसून सुरतमध्ये अंत्यसंस्कारासाठी जात होते.

.

.

.

पालघरमध्ये दोन साधूंची जमावाने हत्या झाली होती

अशीच एक घटना 16 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात घडली. येथेही मूल चोरीच्या संशयावरून दोन साधूंसह ३ जणांना बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने ७० वर्षीय साधू कल्पवृक्ष गिरी आणि ३५ वर्षीय साधू सुशील गिरी यांच्यासह त्यांचा चालक नीलेश तेलगडे यांची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 250 जणांना अटक केली होती. हे दोन्ही साधू मुंबईहून सुरतला त्यांच्या कारने जात असताना पालघरच्या गडचिंचले गावात जमावाने त्यांची हत्या केली

लवकर कारवाई होईल – आचार्य तुषार भोसले

महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना नाही

महाराष्ट्रातील साधूंवर हल्ल्याची ही पहिलीच घटना नाहीये. 2020 मध्ये,  पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावाने 2 साधूंना बेदम मारहाण केली होती. ते साधू कारमध्ये बसून सुरतमध्ये अंत्यसंस्कारासाठी जात होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार