अमळनेर :- अमळनेर येथील कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहेे. सतरा मजली इमारतीची लिफ्टची दुरुस्ती सुरू असतांना शिडी सरकली. यामुळे १६ व्या माळयावरून खाली पडून दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघे जण शिरूड ता.अमळनेर येथील रहिवासी होते. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता सूरत येथील पांडेसरा भागात घडली.
नीलेश प्रल्हाद पाटील (२८) व आकाश सुनिल बोरसे (२२) अशी या तरुणांची नावे आहेत. सुरत येथील पांडेसरा भागात प्लॅटिनियम प्लाझा या सतरा मजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. त्यासाठी नीलेश व आकाश हे दोघे जण लिफ्ट बसविण्याचे काम करीत होते. शिडीवर उभे राहून दोघे जण काम करीत होते. यामुळे शिडी अचानक सरकली.
त्यात त्यांचा दोघांचा तोल जाऊन ते १६ व्या मजल्यावरुन खाली पडले. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दोन्ही जण हे नुकतेच गणेशोत्सव साजरा करून मजुरीसाठी सुरत येथे गेले होते. दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. आकाश याच्या पश्चात आई, वडील, भाऊ तर निलेश याच्या पश्चात वडील व भाऊ असा परिवार आहे.
हे वाचलंत का ?
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






