घरात लघुशंका केल्याच्या राग आल्याने मोठ्या भावाने डोक्यात मुसळी मारून केली लहान भावाची केली हत्या

Spread the love

दिवसभर प्रेत घरात,उशिरा रात्री बोथ्यात भरून त्याला फेकले गिरणा नदीत,पोलिसांनी संशयितास एरंडोल बस स्टँड वरून घेतले ताब्यात

झुंजार प्रतिनिधी कासोदा
कासोदा :- दि 16 सप्टेंबर रोजी एरंडोल तालुक्यातील भातखेडे येथे एका पुरुषाच्या मृतदेह आढळुन आला होता परिसरातील नागरिक व पोलिसांनी तपास केल्याने
त्या मृतदेहाची ओळख पटली असून तो उत्राण गु.ह येथील सत्यवान धोंडू महाजन वय 55 वर्षे याचा असल्याचे आढळून आले व तो पाण्यात वाहून न येता त्याचा सख्या मोठ्या भावानेच हत्या केल्याचे निदर्शनास आले त्यावरून कासोदा पोलीसांनी तपासचक्र फिरवून आरोपी भगवान धोंडू महाजन यास अटक केली.
याबाबत कासोदा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्राण गु.ह येथील भगवान धोंडू महाजन (६२) हा लहान भाऊ सत्यवान महाजन सोबत एकाच घरात एकत्र राहतात दोघेही मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. त्याच्या कायमच काहीही किरकोळ वाद होत होते. घरात हे दोघे भाऊ राहतात व एक भाऊ व आई चाळीसगाव येथे राहतात

भगवान व सत्यवान हे दोघे जरी एकत्र राहत होते तरी ते दोघे आपला स्वयंपाक वेगवेगळे करीत होते. सत्यवान हा मोठ्या भावास नेहमी त्रास देत होता व दोनघांमध्ये नेहमी छोटी मोठी भांडणे होत होती. लहान भावाच्या जाचाला कंटाळून भगवान महाजन याने दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास बाथरूम मध्ये सत्यवान हा लघुशंकेस जाऊन आला व त्याने त्याठिकाणी पाणी टाकले नाही त्यामुळे घरात दुर्गंधी येत होती हे त्याचे नेहमीचे असल्याने भगवान यास राग आल्याने भगवान याने सत्यवान याच्या पाठीमागून घरात पडलेली लोखंडी मुसळीने त्याच्या डोक्यावर मारले व मुसळीने वार करीत राहीला नंतर त्यास ओढत नेवून घरातील मागील खोलीत झाकून ठेवले

त्यानंतर दूध देण्यासाठी दूधवाला आला त्याने घरात रक्त पडलेले पाहिले व तो म्हणाला की या ठिकाणी काहीतरी झाले आहे.एवढे बोलून तो निघून गेला त्या नंतर भगवान हा ग्रामपंचायतच्या ओट्यावर बसून पेपर वाचत बसून राहिला संध्याकाळपर्यंत भगवान हा घरात न राहता ग्रामपंचायतीच्या ओट्यावर न जेवता झोपला व मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान घरात जावून पडलेले रक्ताची साफसफाई करुन कापूस भरण्याच्या बोथ्यात सत्यवान याचा मृतदेह टाकून त्यास जुन्या सायकलीवरून गिरणा नदीत वाहत्या पाण्यात बोथ्याची सुतळी उघडून सत्यवान याच्या मृतदेह नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला.

13 तारखेच्या मध्यरात्री फेकलेला मृतदेह हा तीन दिवस पाण्यात वाहत होता मृतदेह फुगल्याने तो भातखेडे येथे नदीकिनारी प्रेत अडकले होते. दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा.उत्राण गावातील विजय धोंडू महाजन यांना फोन करून गावाबाहेरील म्हसोबा मंदिराजवळ भेटण्यास बोलवले व गावातील चर्चेबद्दल सांगून सदर आरोपीस कासोदा पोलीसात स्वतः जमा होवू जा परंतु आरोपी हा शेतात निघून गेला व तेथून फरार होण्याच्या मार्गावर होता

परंतु उत्राण पोलीस पाटील व विजय महाजन यांनी त्यास एरंडोल बस स्थानकावर आडवून कासोदा पोलीसांच्या स्वाधीन केले. त्यावरून कासोदा पोलीस स्टेशनला आरोपी भगवान महाजन यांच्या विरोधात भादवीकलम 320गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्राण येथे हत्या झाल्याचे कळताच उपविभागीय पोलीस उपअधीक्षक भारत काकडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

हे पण वाचा

टीम झुंजार