मंत्री गिरीष महाजन व मा.खासदार विकास महात्मे यांनी केली होती शिफारस
निंभोरा(प्रतिनिधी)
रावेर :- नवी दिल्ली येथील भारतीय अन्न सार्वजनिक वितरण “एफसीआय” या महत्वपूर्ण समितीवर अहीरवाडी येथील धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष व भाजपा युवा कार्यकर्ते संदीप सावळे यांची नियुक्ती झाली आहे.त्यांना याबाबत नियुक्तीचा आदेश निकताच प्राप्त झाल आहे. राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन,माजी खासदार विकास महात्मे यांच्या शिफारशी वरुन “एफसीआय”चे सचिव मदन मोहन मौर्या यांनी ही नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली येथील भारतीय अन्न-धान्य ग्राहक व्यवहार मंत्रालय तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग इत्यादी समितीवर आता संदीप सावळे सदस्य म्हणून काम बघणार आहे.उत्पादकांच्या तसेच ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून आणि भारतीय अन्न महामंडळाला “एफसीआय”अन्नधान्याची खरेदी, साठवणूक, वितरण, इत्यादी संबंधीच्या विविध बाबीं संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला असणार आहे.राज्य-केंद्रशासित प्रदेशासाठी सल्लागार समितीमध्ये खासदार अन्न आणि नागरी पुरवठा सचिव ‘एफसीआय’ चे संबंधित महा-व्यवस्थापक केंद्र सरकारने नामनिर्देशित केलेले असे अ-शासकीय सदस्य या समितीमध्ये असतात. त्यांच्या नियुक्ती बद्दल खासदार रक्षा खडसे डॉ राजेंद्र फडके आ राजूमामा भोळे किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्रा प्रमुख सुरेश धनके माजी जि प सदस्य रंजना पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन पद्माकर महाजन तालुकाध्यक्ष राजेंद्र लासुरकर उत्तर महाराष्ट्र प्रमुख धनगर समाज समिती रामेश्वर पाटील भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन लखन सावळे डॉ भगवान कुयटे अॅड प्रविण पाचपोहे,निलेश सावेळे,स्वप्निल सोनवणे,शुभम नमायते, राजु पाचपोळे,देवलाल बाविस्कर,मनोज धनगर,यांनी अभीनंदन केले आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






