झुंजार । प्रतिनिधी साने गुरुजी प्राथमिक विद्यालय,एरंडोल येथील प्राथमिक शिक्षिका तसेच खडके बु ता.एरंडोल येथील रहिवासी निकिता योगेश पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा सन २०२२ या वर्षाचा “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार” जळगाव चे आमदार राजु मामा भोळे यांच्या हस्ते१८ सप्टेंबर रोजी अल्पबचत भवन जळगाव येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात प्रदान करण्यात झाला.
निकिता पाटील यांनी आतापर्यंत अनेक उपक्रम राबविले आहेत. शाळेत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देणे,कोरोना काळात शाळा बंद असल्या कारणाने घरी जाऊन विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले,जीवनात शिक्षणाचे काय महत्व आहे हे पटवून दिले.शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या,स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला.
प्रभात फेरीचे आयोजन केले.स्वच्छ भारत अभियान योजना अंतर्गत उपक्रम राबविले.
वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केले.विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.निकिता पाटील यांना पुरस्कार प्राप्तीबद्दल खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.