जळगाव :- भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल,पाळधी येथील मुख्याध्यापक श्री सचिन पाटील सर यांना यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021-22 प्रदान करण्यात आला.

अल्पबचत भवन,जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात, राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेमार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे जीपीएसचे युवा प्राचार्य माननीय श्री सचिन नाना पाटील मानकरी ठरले. सदर सन्मान सोहळ्यास श्री राजू मामा भोळे, डॉक्टर केतकी पाटील, पाचोर्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील, राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या सौ वाघ मॅडम,आदी मान्यवर उपस्थित होते. अगदी तरुण वयात प्राचार्य प्रति विराजमान झाल्यानंतर आपल्या वकृत्वाने व कर्तृत्वाने अल्पावधीत शिक्षण क्षेत्रात नावाजलेले, आपल्या उपक्रमशीलतेमुळे ओळखले जाणारे, व्यवस्थापन,पालक तसेच विद्यार्थ्यांच्या गळ्यातल्या ताईत असणारे जवखेडा बुद्रुक येथील निवासी श्री सचिन पाटील यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला,

यापूर्वीही प्राचार्य श्री सचिन पाटील यांना भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार, सरस्वती सन्मान 2021-22, आदर्श प्राचार्य पुरस्कार आदी प्रदान करण्यात आले आहे. अगदी तरुण वयात आपल्या कर्तृत्वाच्या ठसा उमटवणाऱ्या श्री सचिन पाटील यांचे जीपीएस चे सर्वेसर्वा माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील व श्री प्रतापरावजी पाटील यांनी अभिनंदनपर सत्कार करून कौतुक केले. आपल्या अनोख्या भाषणाने सभागृहात उपस्थित सर्वांची मने जिंकणाऱ्या सचिन पाटील यांचे शिक्षणाधिकाऱ्यांसह सर्वच मान्यवरांनी कार्यक्रमाच्याप्रसंगी विशेष कौतुक व अभिनंदन केले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






