सोयगाव, दि..१९…सोयगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीच्या पावसामुळे सोयगाव तालुक्यात बनोटीची हिवरा,घोसलाची खटकाली आणि पळाशी गावाची कापुरा या तीन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती.. त्यामुळे तालुका प्रशासनाचे आपत्ती निवारण पथक सोमवारी थेट नदी पात्रावर धडकले दरम्यान बनोटीच्या हिवरा नदीचा पूर तब्बल आठ तास धोक्याचा पातळी ने वाहत होति…
सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या आणि बनोटी भागातील ढगफुटीच्या पावसाने तीन नद्यांनी रौद्ररूप धारण केले होते यामध्ये घोसला येथील खटकाली नदीच्या पुरात चक्क महसूलचे आपत्ती निवारण पथक तासभर अडकून राहिल्याने बनोटी भागात मदत कार्य ठप्प झाले होते सोयगाव तालुक्यात पूरग्रस्त स्थितीं निर्माण झाल्याने सोमवारी सीयगाव तहसिल कार्यालयाचे महसुल कर्मचाऱ्यांचे एक पथक बनोटी कडे तातडीने रवाना झाले होते
या पथकातील कर्मचाऱ्यांनी नदी पात्रा वर नजर ठेवून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले होते तहसीलदार रमेश जसवंत यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार विठ्ठल जाधव, महसूल सहायक शरद पाटील,अनिल पवार यांच्या सोबत तब्बल दहा कर्मचारी पूरग्रस्त स्थिती वर लक्ष ठेवून होते दरम्यान सोयगाव तालुक्यात पूरग्रस्त स्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले असून कोणताही अनर्त घडला नसल्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले
—-गाव कोतवाल रात्रभर परिस्थितीवर लक्ष ठेवून
दरम्यान रविवारी सायंकाळ पासून सुरू झालेल्या पावसाचा जोर अधिक झाल्याने सोमवारी तालुक्यात पूरग्रस्त स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते सोमवारी रात्री या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गाव कोतवाल यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले…

छायाचित्र ओळ–बनोटीच्या नदी पात्रावर पोहचले महसूल पथक