झुंजार । प्रतिनिधी
विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने एरंडोल येथील मजूर ठार झाल्याची घटना येथील फरकांडे रस्त्यावरील भवानी जिनिंग समोर आज दि. २० सप्टेंबर रोजी दुपारी घडली. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एरंडोल येथील राहुल दत्तु कुंभार (२२) हा विटांच्या भरलेल्या ट्रॅक्टरवर मजूर म्हणून कामास होता सदर विटांनी भरलेले ट्रॅक्टर एम.एच.१९ सी.वाय १६०९ हे एरंडोलहून फरकांडेकडे जात असतांना भवानी जिनिंग जवळ ट्रॅक्टरमधील दोरी लोंबकळत असल्याने ती दोरी वर ओढण्याच्या प्रयत्न करीत असतांना त्याचा तोल गेल्याने तो चाकाखाली आल्याने त्यास गंभीर दुखापत झाली
हे ट्रॅक्टर चालक विनोद सोनु कुंभार याच्या लक्षात आल्या बरोबर त्याने १०८ या रुग्णवाहिकेला फोन करून बोलावले व गाडीत टाकून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डाॅक्टरांनी राहुल यास तपासून मयत घोषित केले. विनोद सोनू कुंभार रा. एरंडोल याने दिलेल्या खबरीवरून कासोदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल हा घरातीलकरता मुलगा होता त्याच्या पश्चात आई-वडिल, एक लहान भाऊ व बहिण असा परिवार असून घरातील तरुण व कर्त्या मुलाच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राहुलवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात डाॅ. कैलास पाटील यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्याच्यावर शोकाकुल वातावरणात रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






