प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- तालुक्यातील विखरण येथे दिवसाढवळ्या मुकादम बाईच्या घरात मागच्या दाराने घरात प्रवेश करून मजुरी वाढण्यासाठी मिळालेले 30 हजार 400 रुपये चोरून नेल्याची घटना सोमवार रोजी दुपारी घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की संजुबाई वना सुर्यवंशी वय-56 वर्ष, धंदा- शेतात काम करणाऱ्या बायांची मुकरदम रा. चोरटक्की रोड विखरण ता.एरंडोलआपला मुलगा गणेश याचे सोबत राहते.संजूबाई ह्या गावातील राहणारे नाना पांडु पाटील यांचे शेतात कांदा खांडण्याचे काम करण्यासाठी मजुर लावण्यात आलेले होते. त्यांचेवर मी मुकरदम म्हणून काम पाहते. व शेतकऱ्यां कडून येणा-या पैशांमधुन मी शेतात काम करणा-या मजुरांना पैसे वाटत असते. मुलगा गणेश हा आमचे गांवात सलुन चे दुकान चालवितो व तो सुद्धा आई सोबत कधी-कधी शेतात मजुरी काम करण्यास येतो. व त्यावर मिळणा-या पैंशांमधुन परीवाराची उपजिवीकी भागवितो लोकांच्या शेतात काम करून मजुरांचे येणारे मजुरीचे रुपये हे घरात असलेल्या लोखंडाचे पेटीत ठेवत असते. व ते पैसे मी मजुरांना दर सोमवारी सायंकाळी वाटत असते. त्या पेटील कोणतेही कुलुप लावत नाही.
आज दिनांक 17/01/2021 रोजी सकाळी 08.00 वा. संजूबाई व मुलगा गणेश असे नेहमीप्रमाणे घराचे समोरच्या दरवाज्याला कुलुप लावुन शेतात निघुन गेले त्यातनंर सायंकाळी 04.00 वा.त्या शेतातुन घरी आले. व घराचे समोरच्या दरवाजाला लावलेले कुलुप उघडुन पाहीले असता माझ्या घराचा मागचा दरवाजा हा उघडा दिसला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, सकाळी शेतात जातांना घराचा मागचा दरवाजा नजर चुकीने उघडा राहुन गेला होता.
त्यानंतर माझे घरात लोखंडाचे टाकीवर ठेवलेली पेटी व सुटकेस मला उघडी दिसली म्हणुन लोखंडाचे पेटीत शेतात काम करणा-या मजुरांचे आलेले पैसे चेक केले असता मला ते पैसे पेटीत दिसले नाही. म्हणुन माझी खात्री झाली की माझे घरात कोणी तरी अज्ञात चोरट्याने माझ्या घराचे उघड्या असलेल्या मागच्या दरवाज्यातुन घरात घुसुन लोखंडाचे पेटीत असलेले 500 रुपयाच्या एकुण 57 नोटा,200 रुपयाच्या 8 नोटा, 100 रुपयाच्या 3 नोटा. असे एकूण 30 हजार 400 रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले म्हणून एरंडोल पोलीस स्थानकात संजूबाई वना सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली एका काशिनाथ पाटील हे पुढील तपास करीत आहे.