झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
इंदापूर :- दि.21/9/2022 रोजी इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक मा.मुजावर साहेबांच्या उपस्थितीत टोल नाका तोडफोड आंदोलन संदर्भात बैठक संपन्न झाली या बैठकीला रिपब्लिकन नेते मा.संजय भैय्या सोनवणे तसेच सरडेवाडी टोल प्रशासनाकडून तीन अधिकारी उपस्थित होते .या बैठकीत चर्चा झाली परंतु कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे उद्या इंदापूर ते हिंगणगाव पर्यंत सर्वांच्या उपस्थितीत हायवेची पाहणी केली जाणार आहे आणि पोलिस निरीक्षक मुजावर साहेब यांच्या उपस्थितीत उद्या आपल्या भागातील नागरिकांना सेवा कशा पध्दतीने टोल प्रशासनाकडून मिळायला पाहिजे त्या विषयावरती चर्चा होईल .टोल प्रशासनाला मान्य असेल तर चांगलीच गोष्ट आहे नाही तर संघर्ष अटळ आहे .

आजच्या बैठकीत रिपब्लिकन नेते मा.संजय भैय्या सोनवणे यांनी सर्व अधिकार्याच्या उपस्थितीत बैठकीत ठणकावून सांगितले नागरिकांना टोल प्रशासन न्याय देणार नसेल तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर पण स्थानिक युवकांना आणि नागरिकांना न्याय मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही .
हे वाचलंत का ?
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.






