पारोळा प्रतिनिधि विशाल महाजन
तालुक्यातील म्हसवे माध्यमिक विद्यालयात
15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.
15 ते 18 वयोगटातील एकूण 80 विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. सदर प्रसंगी डॉ.राहुल पवार( समुदाय आरोग्य अधिकारी )पारोळा, मनोहर चौधरी(आरोग्य सेवक) ,हर्षल पाटील (आरोग्य सेवक), श्रीमती साळुंके मॅडम( आरोग्य सेविका), सुनंदा चौधरी (आशा वर्कर) यांनी लस दिली. तसेच लसीकरणाच्या सुरुवातीस संस्थेचे सचिव भैया साहेब पवार सर व मुख्याध्यापिका श्रीमती सरिता देशमुख यांनी संपूर्ण आरोग्य कर्मचारी यांचे बुके व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक जितेंद्र पवार,शरद पाटील, शोभा बेहरे, ललिता सूर्यवंशी, विजय महाजन ,गोरख पाटील, उमाकांत पाटील उपस्थित होते.