झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
इंदापूर :- शिवतीर्थावर ती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला माननीय उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमध्ये आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे, त्याचाच आनंद इंदापूर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने निमगाव केतकी गावामध्ये साखर वाटून फटाक्यांची आतीशबाजी करत आनंद उत्सव साजरा केला , शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी चालू केलेला दसरा मेळावा कोविड चा कालावधी वगळता अखंडितपणे शिवतीर्थावर ती पार पडत होता. एकच नेता एकच व्यासपीठ आणि असंख्य लाखो शिवसैनिक हे समीकरण महाराष्ट्राने बघितले .
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवतीर्थावरती विचारांचे सोने लुटण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होणार आहे त्यावेळेस आपणही उपस्थित रहा असे आवाहन यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अँड. नितीन कदम यांनी केले ,सदर कार्यक्रमा वेळी शिवसेनेचे निमगाव केतकीचे बबनराव खराडे उप तालुकाप्रमुख रणजीत बारवकर ,संजय भोंग ,जगन्नाथ आदलिंग ,अमोल जाधव ,श्याम शेंडे, प्रकाश जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावर्षीचा दसरा मेळावा ऐतिहासिक असेल आणि सर्व रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवणार असेल अशी आशा यावेळी अँड. नितीन कदम यांनी व्यक्त केली.
हे वाचलंत का ?
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.