झुंजार । प्रतिनिधी पारोळा
पारोळा :- शहराचे आराध्य दैवत श्री प्रति तिरुपती बालाजी महाराज ब्रह्म उसत्व ला 26 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. त्यामुळे उसत्व वाची पूर्व तयारी ही कधीपासून सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने या वर्षापासून श्री बालाजी महाराजांचे निघनारे वाहनावर लाकडाऐवजी शंभर किलो वजनाचे लोखंडी सिंहासन बनवण्यात आले आहे.
शहरातील या ब्रह्मोत्सवला जवळपास पावणे चारशे वर्षाची परंपरा आहे. आजही रथ, वहने, सिंहासन, भावले हे लाकडाचे आहेत. त्यातील काही वस्तू जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे श्री बालाजी महाराज महाप्रसाद समितीचे उपाध्यक्ष रमेश भागवत यांनी वाहनावरील जीर्ण झालेला लाकडी सिंहासन हे पूर्णपणे लोखंडी बनवलेले आहे. त्यांचे स्वतःचे वर्कशॉप असल्याने त्यांनी संस्थान कडून कुठलीही या बदल्यात मोबदला न घेता स्वतः श्रमदान करून फुकटात ते सिंहासन संस्थानला बनवून दिले आहे.
जवळपास शंभर वर्षे हे सिंहासन चे आयुष्यमान राहणार आहे. श्री भागवत हे गेल्या अनेक वर्षापासून श्री बालाजी महाराज यांची सेवा विनामोबदला वेगवेगळ्या माध्यमातून देत आहेत. वहन व रथ यामागील जनरेटरची सुविधा फिटिंग आदी देखील ते मोफत करून देत आहेत. त्यामुळे त्यांची बालाजी भक्ती ही शहरात प्रसिद्ध आहे. जवळपास एक कुंटल वजनाचे हे सिंहासन आता रोज वहनावर वापरले जाणार आहे.
26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर हा उसत्व साजरा करण्यात येणार आहे. यासाठी प्रमुख विश्वस्त श्रीकांत शिंपी, माजी खासदार ए टी पाटील, डॉक्टर अनिल गुजराती, दिनेश गुजराती,प्रकाश शिंपी,केशव क्षत्रिय, तसेच महाप्रसाद समितीचे सदस्य दिलीप शिरुडकर, दत्तात्रय महाजन, किरण वाणी, सुनील पाटील, विश्वास चौधरी, प्रमोद शिरोळे, गुणवंत पाटील, बापू कुंभार, संदीप धमके, अमोल वाणी आदी त्या तयारीत गुंतले आहेत.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम