शेती क्षेत्रात काम करीत असताना उपयुक्त असलेल्या गोष्टी म्हणजेच यांत्रिकीकरण,संरक्षित शेती, प्रक्रिया उद्योग, कृषी संलग्न व्यवसाय, इ. सर्व गोष्टी समावेशक असलेली परिस्पर्श करणारी एकमेव योजना….
पारोळा ( चोरवळ ) :- शेती हा व्यवसाय बिना भरोशाचा व निसर्गावर अवलंबून असल्याची आजपर्यंतचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मी माझे कृषी क्षेत्रातील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून एका खाजगी कंपनीत नोकरी केली परंतु नोकरीत मन रमत नसताना शेती क्षेत्रात कार्य करण्याचे ठरवले परंतु घरच्यांचा व मित्रमंडळीचा मोठा विरोध झाला.
परंतु मनामध्ये एक इच्छा बाळगून शेती क्षेत्रात कार्य करण्याचे ठरवले व सर्वांचा विरोध जुगारून मी माझ्या शेतीमध्ये काम सुरू केले सुरुवातीला बहुतांश अडचणी त्यातली प्रमुख्याने माझ्या गावात असलेली शेती करता पाण्याची समस्या यावर मात करण्यासाठी मी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात संपर्क करून सुरवातीला राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत ला 44 X44x5 मी. चे शेततळे करुन सिंचनाकरिता उपयुक्त पाण्याचा साठा पहिले माझ्या शेतात निर्माण केला.

परंतु शेततळे निर्माण करूनच फायदा होत नसल्याने मी याकरिता आवश्यक असणाऱ्या इतर गोष्टींबाबत माहिती संकलित करतेवेळी आमच्या गावाचा समावेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) योजनेची माहिती प्राप्त करून या योजनेत शेतकऱ्यांना आवश्यक प्रत्येक गोष्टीचा विचार करून बाबींचा समावेश करण्यात आला आहे. मी शेततळे पूर्ण केले होते परंतु पाणी वापरा करिता व पाणी शेतापर्यंत नेण्याकरिता आवश्यक असलेले मोटर व PVC पाइप ची खरेदी करून माझे संपूर्ण शेती क्षेत्र ठिबक सिंचन व तुषार सिंचन खाली आणले या करिता मला 80 टक्के अनुदान पोक्रा योजने च्या माध्यमातून मिळाले.
याचाच फायदा मला माझं पूर्ण क्षेत्र बारमही बागायती करण्याकरता फायद्याचे ठरले. माझे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली आल्याने मी या ठिकाणी पेरू व लिंबू या फळ पिकाची लागवड पोक्रा योजनेतून 75 टक्के अनुदानावर केली. तसेच शेतकरी हा अन्नदाताच न राहता ऊर्जाडाटा बनला पाहिजे या करिता मी माझ्या शेतीच्या बांधावर पोक्रा योजनेच्या माध्यमातून बांबूची लागवड देखील केलेली आहे.

तसेच शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने शासन व प्रशासन फार मोठे काम या ठिकाणी करत आहे मी पोक्रा योजनेच्या माध्यमातून घरच्या घरी सेंद्रिय खत निर्मिती करिता गांडूळ खत व नडेप लाभ देखील या योजनेतून मला मिळाला आहे. त्याचप्रमाणे माझं शेततळ मध्ये पाणी साठवण्याची क्षमता अधिकचे असल्याने मी यामध्ये कृषी संलग्न उद्योग म्हणजेच मत्स्यपालन त्याकरिता लागणारे मत्स्यबीज ची खरेदी देखील मी पोक्रा योजनेच्या माध्यमातून केलेली आहे.
या योजनेचे माध्यमातून वरील या वैयक्तिक योजना च्या माध्यमातून मला फायदा झालेला आहे परंतु या योजनेच्या माध्यमातून मी शेतकरी गटाची नोंदणी करून चालू वर्षी अवजार बँकेची खरेदी केलेली आहे माझा अवजार बँकेवरील वरील प्रकल्प खर्च हा 13 लाख रुपये होता व त्या पोटी आमच्या गटास मिळालेले अनुदान हे 7 लाख 23 हजार आहे.(60 टक्के ) अनुदान या योजनेतून मिळाले आहे.
याकरिता मला कुठलीही बँक कर्जाची गरज भासली नाही हे या योजनेचे वैशिष्ट्य असून आपला प्रकल्प २० लाखापर्यंत असल्यास तुम्हाला कुठल्याही बँकेच्या कर्जाची गरज नाही म्हणजे शेतकऱ्यांची किंवा शेतकरी गटाचे मुख्य अडचण म्हणजे बँक कर्जाचे असते परंतु या योजनेत तुम्ही शेतकरी गट च्या सदस्य मिळून प्रकल्प खर्चाची पूर्ण रक्कम बँक खात्यात जमा केल्यास तुमच्या प्रकल्पाला मान्यता मिळते फार मोठा फायदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहे.
तसेच भविष्यात मी गटाच्या माध्यमातून 60 टक्के अनुदानावर गोदाम बांधकाम चा प्रस्ताव सादर केलेला आहे तसेच क्लिनिंग ग्रेडिंग व शॉर्टिंग मशीन देखील मी पोखरा योजनेतून भविष्यात खरेदी करणार आहे. तसेच वैयक्तिक लाभाचे योजनेमध्ये मी रेशीम उद्योगाकरिता तुतीची लागवड केलेली असून एक एकर क्षेत्रावर शेडनेटची उभारणी देखील करणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य लाभलेला असून शेतकरी आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने फार चांगली अशी योजना शासनाची आहे.
या योजनेच्या माध्यमातून माझ्यासह शेतकऱ्यांना एकत्रित करून मार्गदर्शन करण्याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव श्री.संभाजी ठाकूर साहेब, कृषी उपसंचालक श्री.अनिल भोकरे साहेब, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्री. कुरबान तडवी साहेब, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. हेमंत बाहेती साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर श्री. जाधव साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री. वारे साहेब, प्रकल्प विशेषज्ञ श्री संजय पवार साहेब, कृषी विज्ञान केंद्राचे श्री.वैभव सूर्यवंशी साहेब, श्री.किरण जाधव साहेब, डॉ मांडवळे साहेब कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.
हे वाचलंत का ?
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.






