अमरावती :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आले असता त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून केला गेला. यादरम्यान संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला. शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके नारे देखील दिलेत. अमरावती संतोष बांगर यांच्या गाडीच्या काचेवर शिवसैनिकांकडून चांगलाच चोप दिला गेला आहे.
शिंदे गटात सर्वा शेवट सहभागी झालेले आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात शिवसैनिकांचा उद्रेक आज पाहायला मिळाला. संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघातील आमदार आहेत. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीमध्ये असताना संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरेंसाठी भरसभेत त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या विश्वासमतासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संतोष बांगर उद्धव ठाकरेंच्या बाजूनं होतं. मात्र, एका रात्रीत संतोष बांगर यांनी गट बदलत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. संतोष बांगर सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे गटात गेले होते. त्यामुळं संतोष बांगर यांची राज्यभर चर्चा झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणारे ते शेवटचे आमदार ठरले होते. मात्र, संतोष बांगर यांच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये रोष निर्माण झाल्याचं आज दिसून आलं आहे.
शिवसैनिकांचा उद्रेक समोर
संतोष बांगर हे आज अमरावतीमधील अंजनगाव सुर्जी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. शिवसैनिकांनी आमदार संतोष बांगर यांची अडवण्याचा प्रयत्न केला. संतोष बांगर यांच्या गाडीच्या चालकानं वेळीच प्रसंगावधान राखत गाडी न थांबवल्यानं पुढील अनर्थ ठळला.
शिवसैनिकांनी बांगरांच्या गाडीवर हात मारले
संतोष बांगर हे अंजनगाव सुर्जीमध्ये आले असता पोलिसांची गाडी पुढे जाताच एक शिवसैनिक त्यांच्या गाडीला आडवा आला. शिवसैनिक पुढं आल्यानं बागंर यांच्या गाडीच्या चालकांनं गाडीचा वेग कमी केला. नेमक्या याचवेळी इतर शिवसैनिक बांगरांच्या गाडीजवळ जमले. बांगर बसलेल्या ठिकाणी गाडीच्या काचेवर शिवसैनिकांनी हात मारले. संतोष बांगर आता घडलेल्या प्रकारावर काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम