धक्कादायक! मुलगा कोमामध्ये असल्याचे समजून चक्क १८ महिने घरात ठेवला मृतदेह:खोलीत 24 तास AC सुरू; ‘डेडबॉडी’चे कपडे रोज बदलत, मालिश व डेटॉलने स्वच्छही करत

Spread the love

कानपुर :- उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरात प्राप्तिकर विभागाच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह चक्क १८ महिने घरात ठेवल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्याचे नाव विमलेश दीक्षित असून ते कोमामध्ये गेल्याचे समूजन कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह घरात ठेवला आहे. विशेष म्हणजे विमलेश लवकर बरे व्हावेत म्हणून त्यांची पत्नी कुजलेल्या मृतदेहावर रोज गंगाजल शिंपडत होत्या. कानपूरमधील एका खासगी रुग्णालयाने त्यांना २२ एप्रिल २०२१ रोजीच मृत घोषित केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार मृत विमलेश दीक्षित मागील १८ महिन्यांपासून कार्यालयात न आल्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून चौकशी करण्यात आली. त्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या आरोग्य विभाग पथकाची मदत घेतली. हे पथक पोलीस कर्मचारी आणि दंडाधिकारी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) यांच्यासह रावतपूर भागातील दीक्षित यांच्या घरी पोहोचले. या पथकाने दीक्षित यांच्या घरी जाऊन अधिक चौकशी केली. त्यानंतर कुटुंबीयांनी दिक्षित अद्याप जिवंत असून ते कोमात असल्याचे सांगितले. शेवटी दीक्षित यांचा मृतदेह लाला लजपत राय (LLR) रुग्णालयात तपासणीसाठी नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

दरम्यान, तब्बल १८ महिने मृतदेह घरात ठेवल्यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापन करण्यात आली आहे. दीक्षित यांचे कुटुंबीय ते कोमामध्ये गेल्याचे शेजाऱ्यांना सांगत असत. मिळालेल्या माहितीनुसार दीक्षित यांच्या पत्नी मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. त्यांचे कुटुंबीय घरात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जायचे, असे शेजाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान आरोग्य विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेला मृतदेह अत्यंत कुजलेल्या स्थितीत होता, असे सांगण्यात आले आहे.

रावतपूरच्या कृष्णापुरी भागात विमलेश यांचे संयुक्त कुटुंब राहते. 2 भाऊ, त्यांच्या बायका, मुले, आई-वडील एकत्रच राहतात. म्हणजे ज्या घरात मृतदेह होता, तिथे 10 हून अधिक सदस्य राहत होते. विमलेश सातत्याने नोकरीवर गैरहजर असल्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्यांच्या घरी येऊन शहानिशा केली. तेव्हा त्यांना घराच्या एका खोलीत विमलेश यांचा ‘ममी’ सारखा मृतदेह दिसला.

ऑक्सिमीटरमुळे संभ्रम, कुटुंबाला वाटले डेडबॉडी जिवंत आहे

23 एप्रिल रोजी सकाळी कुटुंबीय अंत्यसंस्काराची तयारी करत होते. तेव्हा शरीरात हालचाल झाल्याचा आभास झाला. हातात ऑक्सिमीटर लावले तर ते पल्स रेट व ऑक्सिजन लेव्हल दाखवू लागले. तेव्हा कुटुंबीयाने अंत्यसंस्कार थांबवले. कोरोनाचा काळ होता. त्यामुळे अंत्यसंस्काराला घरातीलच सदस्य उपस्थित होते. कुटुंबीयांनी पुन्हा विमलेश यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण कोरोना महामारीमुळे कोणत्याही रुग्णालयाने त्यांची व्यथा ऐकली नाही.

हा फोटो विमलेश यांचा आहे. ते अहमदाबादच्या प्राप्तिकर विभागात तैनात होते. पत्नी व मुले कानपूरला राहत होते. कोरोनात 22 एप्रिल 2021 रोजी त्यांचा कानपुरात मृत्यू झाला होता.

मृतदेह जिवंत असल्याचे मानून घरी नेले

शेवटी कुटुंबीयांनी विमलेश यांचा मृतदेह जिवंत असल्याचे मानून घरी आणला. त्यानंतर विमलेश यांची बँक अधिकारी पत्नी मिताली, वडील राम अवतार, आई व सोबत राहणारे 2 भाऊ दिनेश व सुनील या सर्वांनी मृतदेह जिवंत असल्याचे मानून त्याची सेवा करू लागले. ते सकाळ-संध्याकाळ त्याची डेटॉलने स्वच्छता करत, तेलाने मालिश करत, दररोज कपडे व अंथरुन बदलत. खोलीतील एसी 24 तास सुरू ठेवत. हे सर्व मागील दीड वर्षांपासून सुरू होते.

यामुळे मृतदेहाचा वास आला नाही

शुक्रवारी मृतदेह ठेवल्याचा खुलासा झाल्यानंतर अॅडिशनल सीएमओ डॉक्टर गौतम आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कुटुंबीय विशेषतः त्यांच्या आई-वडिलांना विश्वासात घेतले. ते म्हणाले – विमलेश जिवंत असेल तर त्याच्यावर हॅलट रुग्णालयात उपचार केले जाईल. त्यानंतर त्यांचे पथक ममी सारखा बनलेला मृतदेह रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

डॉ. गौतम म्हणाले – विमलेश अत्यंत सडपातळ होते. कोरोनामुळे ते अधिकच कमजोर झाले. घरातील ज्या खोलीत पलंगावर मृतदेह ठेवण्यात आला होता. तेथील एसी 24 तास सुरू ठेवला जात होता. रोज अंथरुन व कपडेही बदलले जात होते.

मृतदेह सुकून आखडला

डॉ. गौतम सांगतात -मृतदेह सडण्याच्या प्रक्रियेत त्यातून पाणी निघते. यामुळे वास येतो. पण विमलेश यांच्या शरीरातून निघणारे पाणी कुटुंबीय वारंवार डेटॉल लावून साफ करत होते. यामुळे मृतदेहात बॅक्टेरिया तयार झाला नाही. मृतदेहाची रोज तेलाने मालीश केली जात होती. या प्रक्रियेमुळे मृतदेह सुकून आखडला गेला. त्वचा पूर्णतः काळवंडली. एकदम ममीसारखी. म्हणजे दीड वर्षे मृतदेहाची अशी काळजी घेतल्यानंतर शेजाऱ्यांना त्याचा वास आला नाही. अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मृतदेहावरही स्वच्छ व नवे कपडे दिसून आले.

शेजारी विमलेशविषयी विचारत तेव्हा कुटुंबीय ते कोमात असल्याचे सांगत. आसपासच्या लोकांनी कुटुंब थोडे वेगळे राहत असल्याचेही सांगितले. त्यामुळे त्यांचा बाहेरच्या लोकांशी फारसा संपर्क नव्हता.

आईने मुलाचे पार्थीव असे सजवले होते की, मृतदेह सडला नाही. तो जागीच सुकून गेला.

संपूर्ण कुटुंब सरकारी नोकरीत

विमलेश यांचे कुटुंबीय सुशिक्षित व सरकारी नोकरदार आहे. पत्नी मिताली बँक मॅनेजर आहे. त्यांना 17 महिन्यांची मुलगी दृष्टी व 4 वर्षांचा मुलगा संभव आहे. मुलगा शहरातील मोठ्या शाळेत शिकतो. वडील राम अवतार ऑर्डिनन्स फॅक्ट्री कानपूरमधून निवृत्त झालेत. छोटा भाऊ कानपूर सिंचन विभागात हेड असिस्टंट आहे. दुसरा भाऊ वीज विभागात ठेकेदारी करतो. संपूर्ण कुटुंब एकत्रच राहते.

घरातील याच खोलीत मृतदेह ठेवण्यात आला होता. कुटुंबातील सदस्य दुसऱ्या खोलीत राहत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार