Benefits of Roasted Chickpeas: आपल्या सगळ्यांनाच भाजलेले चणे फार आवडतात. त्यातून अधूनमधून आपल्याला लहर आली तरीही आपण चणे विकत घेतो आणि खातो. परंतु केवळ स्वाद म्हणून तुम्ही जर चणे खात असाल तर आपल्या आहारात चणे खाण्यास सुरूवात करा. कारण भाजलेले चणे खाण्याचे फायदे अनेक आहेत.
भाजलेल्या चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट (Carbohydrates), प्रोटीन (Protein), कॅल्शियम (Calcium), आयर्न (Iron) आणि व्हिटामिन (Vitamins) असते. भाजलेल्या चण्याचे आरोग्यासाठी इतके फायदे आहेत. तेव्हा जाणून घेऊया चण्यांचे नक्की फायदे काय आहेत..
प्रतिकारक्षमता वाढते (Immunity Booster)
दररोज नाश्त्यामध्ये अथवा जेवणाच्या आधी भाजलेले चणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रोगप्रतिकारक क्षमता वाढल्याने अनेक आजारांपासून रक्षण होते तसेच ऋतू बदल झाल्याने शारिरीक समस्याही दूर होतात.
लठ्ठपणा कमी होतो (Obesity)
जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर भाजलेले चणे खाणे फायदेशीर ठरते. दररोज भाजलेले चणे खाल्ल्याने लठ्ठपणाच्या समस्येवर मात करता येते. याच्या सेवनाने शरीरातून अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
युरिनसंबंधीच्या समस्या दूर होतात (Urine Problems)
भाजलेले चणे खाल्ल्याने युरिनसंबंधीच्या समस्या दूर होतात. ज्यांना सतत लघवीला होत असेल त्यांनी चणे आणि गूळ खावे.
बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते (Constipation)
ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तींनी नियमितपणे चण्याचे सेवन करावे.
पचनशक्ती वाढते (Digestion)
पचनशक्ती वाढवण्यासाठी दररोज चण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते यामुळे रक्त शुद्ध होते तसेच त्वचा उजळते. चण्यामध्ये फॉस्फरस असते ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
मधुमेहावर गुणकारी (Diabetes)
भाजलेले चणे खाल्ल्याने डायबिटीजच्या रुग्णांना फायदा मिळतो. भाजलेले चणे ग्लुकोजची मात्र कमी करतात. डायबिटीजच्या रुग्णांनी नियमितपणे चणे खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
(Disclaimer : वर दिलेली माहिती ही सामान्य ज्ञान आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. Zunjaar News याची खात्री करत नाही.)
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम