श्रीक्षेत्र पद्मालय येथील विकासकामांसाठी चार कोटी रुपये मंजूर.-आमदार चिमणराव पाटील.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पद्मालय येथील विकासकामांसाठी चार कोटी रुपयांचा निधी मानाजूर झाला असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.तसेच शहरातील म्हसावद रस्त्यावरील सरस्वती कॉलनीमध्ये सामाजिक सभागृह आणि उद्यानासाठी देखील लवकरच निधी मंजूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पद्मालयला तीर्थस्थळाचा ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र पद्मालय येथी मंदिर परिसरातील कामांसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.श्रीक्षत्र पद्मालय परिसराचा विकास झाल्यास भाविकांची गैरसोय दूर होणार आहे.पद्मालय परिसरातील समस्या सोडविण्याबाबत मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामस्थांशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.शहरातील म्हसावद रस्त्यावर असलेल्या सरस्वती कॉलनीत सभामंडपासाठी आणि उद्यानविकासासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी रहिवाशांना दिले.

यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात मंजूर झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.शहरासाठी एका वर्षात सुमारे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कामांना सुरुवात झाली आहे तर अनेक कामे पूर्ण झाली आहेत.अंजनी नदीवर बांधण्यात येणा-या रंगारी खिडकी ते गांधीपुरा या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पुलाचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे सांगितले.अंजनी आणि पद्मालय प्रकल्प क्रमांक दोन यासाठी सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार संघाच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,बबलू पाटील,बाळासाहेब पाटील,चिंतामण पाटील,शेतकी संघाचे माजी अध्यक्ष पोपट नाईक,ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव,माजी उपनगराध्यक्षा शकुंतलाअहिरराव,प्रा.आर.एस.निकुंभ,जी.एन.चव्हाण,सोपान पाटील,विठ्ठल आंधळे,एस.के.चौधरी,अनिता चव्हाण यांचेसह कॉलनीतील रहिवासी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टीम झुंजार