पारोळा :- पोलिसांनी रात्रगस्त दरम्यान तामसवाडी येथे बकरी चोरून घेऊन जातांना रात्री 02/00 वाजताचे दरम्यान दोन इसम संशयास्पद स्थितीत दिसून आलेने त्यांना ड्युटीवरील पो कॉ अभिजित पाटील,होम गार्ड चेतन पाटील,होम गार्ड गोपाळ पाटील यांनी दोन्ही संशयितांनी ताब्यात घेऊन बकरी कोणाची आहे कोठून आणली बाबत विचारपूस केली असता चोरटे उडवाउडवीची उत्तरे देत होते,
चोरट्याना नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे 1)शंकर सखाराम भिल तामसवाडी 2)रामकृष्ण रघुनाथ पारधी रा तामसवाडी असे सांगून तामसवाडी येथीलच श्री दिलबर रमेश मोरे रा तामसवाडी यांची बकरी चोरलेचे कबूल केलेने श्री दिलबर मोरे यांना पारोळा पो स्टे येथे बोलावून घेतले असता त्यांनी त्यांचीच बकरी असलेचे
खात्रीपूर्वक ओळ्खलेने फिर्यादीचे फिर्याद वरून कलम 379 IPC प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद दोन्ही आरोपींना अटक केली आहे,
पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो ना प्रदीप पाटील पुढील तपास करीत आहे.
या बातम्या वाचल्यात का?
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






