करमाळा तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी भारतात चौथी
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि.१८/ करमाळा तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय येथील विद्यार्थीनी कुमारी आदिती जितेंद्र चांदगुडे हीचे राष्ट्रीय योगासन स्पर्धेत चौथा क्रमांक आला ही राष्ट्रीय स्पर्धा केंद्र शासन मान्यता योगा फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आली. या स्पर्धेत भारतातील प्रत्येक राज्यातील संघाचा सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेमध्ये महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील विद्यार्थीनी कुमारी आदिती जितेंद्र चांदगुडे हीने 14 ते 16 वयोगटातील खेळाडूंचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आपल्या प्रशालेतील इयत्ता सातवी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी कुमारी आदिती जितेंद्र चांदगुडे हीने भारत देशात चौथा क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. श्री जयवंतराव जगताप साहेब, करमाळा नगरपालिका चे नगराध्यक्ष श्री वैभवराजे जगताप साहेब, संस्थेचे विश्वस्त श्री शंभूराजे जगताप साहेब, संस्थेचे प्राचार्य श्री कापले पी. ए., उपमुख्यध्यापक श्री बागवान ए. एच., पर्यवेक्षक श्री शिंदे एस. टी., पर्यवेक्षक श्री पाटील बी. के., संस्थेचे सचिव श्री तरकसे एम. एस., विभाग प्रमुख श्री पवार व्ही. एल., तसेच मार्गदर्शन करणारे विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री दळवे एस. बी., व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थीनी ला मार्गदर्शन करणारे आरजू पठाण, शेळके सर,सागर शिरसकर मार्गदर्शन करणारे महात्मा गांधी विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री दळवे एस. बी. यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूचे व मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.