जळगाव जिल्ह्यातील ‘या’ बी.जे.पी आमदाराचे फेसबुक अकाऊंट हॅक,लिंक असलेल्या क्रेडिट कार्डमधून ७० हजार लांबिवले

Spread the love

चाळीसगाव : – सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या काही केल्या कमी होत नाहीये दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. फडवणुकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करूनही या घटना वाढतच असल्याचे दिसतेय. अशातच चाळीसगाव तालुक्याचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची बातमी समोर आलीय. अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेतलेला धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला. यामुळे जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मिडियावरील फेसबुक अकाऊंट मंगेश चव्हाण यांचे फेसबुक पेज हॅक केलं. त्यानंतर प्रोफाईल फोटो बदलून त्यावर काळा बुरखा (कपडा लपेटलेला) चेहरा व हातात चाकू घेतलेल्या व्यक्तीचा धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला. या फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट देखील डिलीट केल्यात.

एवढेच नव्हे तर मंगेश चव्हाण या फेसबुक पेजला लिंक असलेले गोपाल म्हस्के यांच्या क्रेडीट कार्डमधून ओ.टी.पी. न घेता ७० हजार ८०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. हा धक्क्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक पेजचे कार्यालयीन कामकाज बघणारे गोपाल म्हस्के रा.टाकळी ता. चाळीसगाव यांच्या तक्रारीवरुन बुधवारी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाभर कानडे हे करत आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार