जळगाव जिल्हा प्रतिनिधि :- ईच्छापूर तांडा क्र.2 ता.चाळीसगाव येथील ग्रा. प. सदस्या सौ. मानसी राजेश चव्हाण यांनी मुदतित जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. म्हणून त्यांना सदस्य पदावरुन अपात्र घोषित केल्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी नुकताच दिला असुन या निर्णया मुळे ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.
या बाबत सविस्तर वृत असे की ईच्छापुर तांडा ग्राम पंचायत सदस्या सौ. मानसी चव्हाण ह्या 9. 1. 2020. रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राखीव जागेतुन सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी मुदतित जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. म्हणून त्यांना सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात यावे. अशी तक्रार श्री. प्रशांत अलिचंद राठोड यांनी दाखल केली असता त्यावर सुनावणी होऊन सौ.मानसी चव्हान यांनी
निवडून आल्याच्या दिनांकापासून 12 महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. ही बाब सिद्ध झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.राऊत यांनी सौ.मानसी चव्हाण यांना ग्रा. प. सदस्य पदावरून अपात्र ठरविले आहे. तक्ररदार श्री प्रशांत राठोड यांचे वतीने अँड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले या निकाला कडे परीसराचे लक्ष्य लागुन होते.
या बातम्या ही वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.