… तर ‘बिग बॉस’मध्येही जाईल, मंत्री गुलाबरावांनी सांगितली ‘सुवर्ण संधी’

Spread the love

जळगाव :- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपण मराठी बिग बॉसमध्ये जाण्यासाठी इच्छुक असल्याचे वक्तव्य केले आहे. महेश मांजरेकरांच्या ईच्छेला गुलाबराव पाटलांनी दिली साद : बिग बॉस सारखी सोन्याची संधी नाही
राजकारणात येण्याच्या आधी मी नाटकात, गाण्यांमध्ये भाग घेत होतो. त्यामुळे जर मला कोणी बिग बॉसमध्ये बोलावले तर नक्कीच ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी असेल व मी बिग बॉसमध्ये जाईल असे पालकमंत्रीगुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. पालकमंत्र्यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलेल्या ईच्छेला एक प्रकारे साद दिल्याचे दिसून येत आहे.

लवकरच मराठी बिग बॉसचे सीजन येत असून, एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांना कोणत्या राजकीय व्यक्तींना बिग बॉसमध्ये सहभागी होणे आपल्याला आवडेल असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मांजरेकरांनी नितेश राणे, अमोल मिटकरी यांच्यासह पाणी पुरवठा मंत्रीगुलाबराव पाटील यांचे नाव घेत, जर हे नेते बिग बॉसच्या घरात आले. तर बिग बॉसची टीआरपी आणखीनच वाढेल असे मांजरेकरांनी सांगितले होते. याबाबत शुक्रवारी पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी जर संधी मिळाली किंवा कोणी बोलावले तर नक्कीच बिग बॉसमध्ये जाईल असे सांगितले आहे.

जिल्ह्यातून १० हजार कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी जाणार

दसरा मेळावा हा काही आमच्यासाठी आजचा सण नाही, गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही दसरा मेळावा साजरा करतो आहे. दसरा मेळाव्यासाठी नियोजन सुरू आहे, आढावा बैठका घेतल्या जात आहेत, किती कार्यकर्ते मुंबईला जातील, याची चाचपणी सुरु आहे. जळगाव ग्रामीण व जळगाव शहर मिळून अडीच हजार तर जिल्ह्यातून १० हजार कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी जाणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार