राज्यस्तरीय एकताच्या काव्य लेखन स्पर्धेत सफरअली इसफ सर्वोत्कृष्ट

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गेली ३४ वर्ष मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या एकता कल्चरल
अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या गणपत गुणाजी जाधव राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत सोलापूरचे कवी सफर अली इसफ यांनी २०२१ – २२ वर्षाचा सर्वोत्कृष्ट कवितेचा पुरस्कार प्राप्त केला आहे. तर द्वितीय पारितोषिक सिंधुदुर्गचे कवी किशोर कदम आणि कांदिवलीचे कवी ईशान संगमनेरकर यांनी तर तृतीय पारितोषिक कल्याणच्या सुधाकर कांबळी व सोनाली जाधव अहिरे यांनी प्राप्त केले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी काम पाहिले असल्याची माहिती एकता कल्चरचे अध्यक्ष प्रकाश जाधव आणि सचिव प्रकाश पाटील तसेच उपाध्यक्ष उज्जय आंबेकर यांनी दिली.
सदर स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे:-
प्रथम क्रमांक – सफर अली इसफ – सोलापूर
दुसरा क्रमांक (विभागून) – ईशान संगमनेरकर – कांदिवली आणि किशोर कदम – सिंधुदुर्ग
तिसरा क्रमांक (विभागून) – सुधाकर कांबळी – कल्याण आणि सोनाली जाधव -अहिरे – कल्याण

उत्तेजनार्थ पारितोषिक- जगदीश राऊत – नागपूर, शुभांगी थोटम – नवी मुंबई, रवींद्र जाधव – लांजा, मेघा गोळे – महाड, संजय भोईर – पालघर, शरद गाडगीळ – मुंबई, मायकललोपीस – वसई
स्पर्धेत महाराष्ट्रातल्या ७० कवींनी सहभाग घेतला होता. डिसेंबरमध्ये मुंबई गिरगाव साहित्य संघात होणाऱ्या ३४ व्या एकता संस्कृतिक महोत्सवात विजेत्या कवींना गौरविण्यात येणार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार