एरंडोल येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून पोलीस स्थानकात भाजपा तर्फे दिले निवेदन.

Spread the love


प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणूनएरंडोल पोलीस स्थानकात सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांना निवेदन देण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काल भंडार जिल्ह्यातील एका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मि मोदीना मारू शकतो व मोदीना शिव्या ही देऊ शकतो असे बेताल वक्तव्य करून आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा अपमानच केलेला नाही तर एक प्रकारे मा.पंतप्रधान यांना धमकी देणारे वक्तव्य केले. यावरूनत्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून गेले निवेदन कांग्रेस ची मा.मोदीजी बद्दल ची शत्रुत्वाची भावना स्पष्ट होते.

या वक्तव्यच्या निषेधात आज दिनांक 18 जानेवारी रोजी भाजपा एरंडोलच्या वतीने निषेध नोंदवून स्थानीय पोलिस स्टेशन मध्ये नाना पटोले विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिले तसेच पुतळ्याचे दहन करण्यात आले.

एरंडोल येथे नाना पटोले यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून स पो नी तुषार देवरे यांना निवेदन देताना अमोल जाधव,अशोक चौधरी, छायाताई दाभाडे व इतर पदाधिकारी

त्याप्रसंगी उपस्थित
तालुका सरचिटणीस अमोल जाधव, राजेंद्र पाटील माजी नगराध्यक्ष,तालुका रविंद्र महाजन माजी नगराध्यक्ष,ओ बी सी सेलचे माजी अध्यक्ष अशोक चौधरी नगरसेवक, ॲड नितीन महाजन,नगरसेविका छायाताई दाभाडे, प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष ,सुभाष पाटील, वाल्मीक सोनवणे, नरेंद्र ठाकरे , ज्ञानेश्वर कांखरे लोकेश महाले, प्रदीप पाटील, अकील शेख ,निता महाजन ,संध्या महाजन, निशा विंचुरकर,नयना पाटील ,आरती ठाकूर ,रत्नाताई देवरे ,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टीम झुंजार