प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल:- तालुक्यातील औद्योगिक बहुउद्देशीय कारागिरांची सहकारी ग्रामोद्योग संस्था मर्यादित एरंडोल या संस्थेचे निवडणूक प्रक्रिया आर टी काबरे विद्यालयात संपन्न झाली.
सदर संस्था ही समाजाच्या सेवेसाठी जे बारा बलुतेदार सुतार लोहार, चांभार ,कैकाडी, फुलमाळी, गवंडी, मातंग व परंपरागत कारागिरी यांच्यासाठी स्थापन झालेली आहे.
सदर पंचवार्षिक निवडणूक सन २०२१/२२ते२०२५/२६ या कालावधीत आहे. निवडणुकीमध्ये विकास पॅनल व परिवर्तन विकास आघाडी पॅनल असे दोन चॅनल्स परस्परविरुद्ध आहेत..
निवडणुकीत एकूण २१५६ मतदार आहेत. यामध्ये अनेक मतदार मयत झाले आहेत उर्वरित त्यापैकी ४५२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सहकार खात्याच्या साळुंके मॅडम, राजेश पाटील, विलास पाटील, रवी पाटील, मनोज पाटील. गोपे रावसाहेब यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले .
निवडणूक संपल्यानंतर लगेच निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला यामध्ये सहकार विकास पॅनलचे एकतर्फी विजय झाला. यामध्ये लोहार नथू चिंधु सर्वसाधारण मत (२०३) , ठाकूर भिका बारकू (२०३), देशमुख गोविंदा माधव (२०१) जाधव राजेंद्र रघुनाथ (१९९), मराठे सिताराम आनंदा (१९८),महाजन रमेश राजाराम (१९६), माळी अलका बाबूराव महिला राखीव (२३६) पाटील प्रतिभा प्रल्हाद (२१२), कुंभार पुनमचंद भिका इतर मागास प्रवर्ग (२३८) सोनवणे प्रकाश प्रभाकर (१९९), भोई पंकज मुरलीधर (२१२) याप्रमाणे सहकार विकास पॅनलचे विजयी उमेदवार आहेत.