अभ्यासिकेच्या माध्यमातून आदर्श पिढी निर्माण होईल.-आमदार चिमणराव पाटील. एरंडोलला नगरपालिकेच्या अभ्यासिकेचे उदघाटन.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी एरंडोल

एरंडोल-विद्यार्थ्यांसाठी नगरपालिकेने सुरु केलेल्या अभ्यासिकेमुळे आदर्श पिढी निर्माण होईल,अभ्यासिका म्हणजे आदर्श पिढी निर्माण करण्याचा कारखाना आहे असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या ‘कर्मवीर अभ्यासिका’चे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.पालिकेने शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुमारे ३८ लाख रुपये खर्च करून अद्ययावत अभ्यास सुरु केली असून यामध्ये विविध परीक्षांसाठी लागणारे पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते अभ्यासिकेचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी पालिकेने राबवलेल्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले.पालिकेने सुरु केलेली अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.विद्यार्थ्यांच्या जिवनात पुस्तकांची महत्वपूर्ण असून सर्वांनी पुस्तकांचे नियमित वाचन करावे असे सांगितले.पालिकेच्या अभ्यासिकेतील पुस्तकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी जाहीर केले.

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका काळाची गरज असून अभ्यासिकेच्या माध्यमातून युवकांना देशसेवा करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.सद्यस्थितीत राजकीय क्षेत्राची पातली खालावली असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.सर्वपक्षीय नेत्यांकडून माध्यमांसमोर खालच्या स्तरावर टीकाटिप्पणी केली जात असून सर्वसामान्य नागरिकांची केवळ करमणूक होत असल्याचे सांगितले.विधायक दृष्टी असलेल्या व चारित्र्यवान उमेदवारांनाच मतदारांनी मतदान करावे असे आवाहन केले.अभ्यासिका आणि अद्ययावत व्यायामशाळा समाजाची गरज असल्याचे सांगितले.

भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख advt.किशोर काळकर यांनी अभ्यासिकेमुळे गरीब विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे सांगितले.पालिकेने शहरात केलेल्या विविध विकासकामांमुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली असल्याचे सांगितले.पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून शहरात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केल्याबादाल त्यांनी समाधान व्यक्त केले.प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी शहरात विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिरे सुरु झाले पाहिजेत हि भूमिका लक्षात घेवून पालिकेने अभ्यासिका सुरु केल्याचे सांगितले.

पालिकेने शहरात स्वच्छता मोहीम,वृक्ष लागवड व संवर्धन,प्लास्टिकमुक्त शहर यासह राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,प्रा.वा.ना.आंधळे,माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे,उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.पालिकेचे कार्यालय अधिक्षक हितेश जोगी यांनी सुत्रसंचलन केले.करनिरीक्षक डॉ.अजित भट यांनी आभार मानले.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,शहराध्यक्ष बबलू चौधरी,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,पारोळा बाजार समितीचे संचालक विजय पाटील,माजी नगरसेवक जहिरोद्दिन शेख कासम,असलम पिंजारी,अभिजित पाटील,डॉ.सुरेश पाटील,डॉ.नरेंद्र ठाकूर,राजेंद्र शिंदे,नितीन महाजन,कुणाल महाजन,युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन,राजेंद्र ठाकूर,दशरथ चौधरी यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी प्रशासक विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधिक्षक हितेश जोगी,बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे,आनंद दाभाडे,करनिरीक्षक डॉ.अजित भट,पाणीपुरवठा अभियंता प्रियांका जैन,रचना सहाय्यक सौरभ बागड,लेखापाल विक्रम घुगे,शरद राजपूत,संगणक अभियंता विकास पंचबुद्धे,डॉ.योगेश सुकटे,महेंद्र पाटील,अनिल महाजन यांचेसह कर्मचा-यांनी सहकार्य केले.

फोटो ओळी-१)एरंडोल येथे अभ्यासिका उदघाटनप्रसंगी उपस्थित आमदार चिमणराव पाटील,त्यांचेसोबत advt.किशोर काळकर,मुख्याधिकारी विकास नवाळे,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,शालिग्राम गायकवाड व पदाधिकारी.

२)एरंडोल येथे अभ्यासिकेचे उदघाटन करताना आमदार चिमणराव पाटील,advt किशोर काळकर,मुख्याधिकारी विकास नवाळे व पदाधिकारी.

टीम झुंजार