यावल,(प्रतिनिधी) :- सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव शिवारात असलेल्या केळीच्या शेतात घेवुन जावुन तिच्या मर्जिविरुध्द फिर्यादी पीडित १९ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करुन तिच्यावर बलात्कार केला यातून १९ मुलगी गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी आरोपी रहेमान मनिराम तडवी याच्या विरुद्ध काल दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोजी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना
फिर्यादीची फिर्याद की यातील आरोपी रहेमान तडवी याने फिर्यादी हि तिच्या वाड्यातील बायांसोबत शेत मजुरीसाठी कामासाठी किनगाव येथे शेतात जात होती. तेव्हा तिची यातील आरोपी सोबत ओळख झाली व ते एकमेकांशी बोलु लागले. त्यानंतर आरोपी याने तिच्याशी ओळख वाढवुन प्रेमसंबंध निर्माण केले. फिर्यादीस धमकी देवुन तिला जबरदस्ती केळीच्या शेतात घेवुन जावुन तिच्या मर्जिविरुध्द फिर्यादीवर सन २०२१ पासून वारंवार अत्याचार करुन तिच्यावर बलात्कार केला असुन सदर फिर्यादी सध्या गरोदर आहे.
फिर्याद दिल्याने सिसिटीएनए स गु.र.नं. ४४७/२०२ २ भा. दं. वि. कलम ३७६ (२) (n), ३७ ६ (२) (ह), ३५४ (अ), ५ ०६ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.तपासी अंमलदार पो. उप निरीक्षक सुदाम काकडे नेम. यावल पो.स्टे. हे आहेत.
हे वाचलंत का ?
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा