पाचोरा,(प्रतिनिधी) :- पीडितेचे पती इलेक्ट्रिक कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना पतीचा मित्र असलेल्या दीपक शंकरराव कंखरे (कृष्णापुरी, पाचोरा) याने शारीरिक संबंध केले. दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी दीपक हा पीडितेचा पती घरी नसताना शारीरिक संबंध करण्याचा आग्रह धरला. तिने त्यास विरोध केला. एक जण पीडितेच्या घरी ऍसिड कॅन घेऊन आला. त्याने दीपकला व्हिडिओ कॉल कर, अन्यथा तुला ऍसिड फेकून मारून टाकू, अशी धमकी दिली
पीडितेने घाबरून दीपक यास व्हिडिओ कॉल केला असता पीडितेस विवस्त्र होण्यास सांगून व्हिडिओ कॉल करुन विवस्त्र फोटो काढले. हे फोटो त्याने सागर चंदन परदेशी (हनुमान नगर, पाचोरा) यास दाखवून त्याला पीडितेच्या घरी पाठवले. सागरने विवस्त्र फोटो दाखवून घरी बोलावले व दि. ३१ ऑगस्ट रोजी अत्याचार केला. दरम्यान दीपक कंखरे याने या विवाहितेचे विवस्त्र फोटो पतीला दाखविले. हा प्रकार असह्य झाल्याने पीडितेने पाचोरा पोलीस स्टेशन गाठले व आरोपीविरुद्ध फिर्याद दिली.आरोपी दीपक व सागर या अटक केली आहे.
प्राप्त माहिती नुसार पतीच्या पश्चात विवाहितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत व नंतर व्हिडिओ कॉलच्या स्क्रीनशॉट घेऊन विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर दोघांनी अत्याचार केले. तसेच ऍसिड फेकून जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली.
पतीच्या मित्रानेच व्हिडिओ कॉल करुन विवस्त्र फोटो काढले नंतर फोटो व्हायरल करण्याची व अंगावर ऍसिड फेकण्याची धमकी देत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पाचोरा येथून समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध भाग ०५ गुरन ४४६/२०२२, भादवी कलम ३७६,३७६(२) (N),३२३,५०६,५०९LT एक्ट ६७(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम