म्हसावद येथे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत योगेश ज्ञानेश्वर वराडे यांना योजनाचा लाभ.

Spread the love

सुमित पाटील प्रतिनिधी वावडदा

म्हसावद ता.जळगाव दि.१७जानेवारी २०२२ वार सोमवार रोजी स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद येथे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत योगेश ज्ञानेश्वर वराडे,इ. बारावी या विद्यार्थ्याचे दोन वर्षापूर्वी अपघाती निधन झाल्यामुळे शासनाकडे विद्यालयामार्फत पाठपुरावा केला कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर दावा मंजूर होऊन शासनाकडून 75000/- रुपयांचा चेक त्याच्या आई व भाऊ यांना सोपवतांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सोनार सर,उपमुख्याध्यापक श्री.बच्छाव सर,पर्यवेक्षक श्री.भंगाळे सर,ज्यू.कॉलेजचे विभाग प्रमुख श्री.योगराज चिंचोरे सर,श्री.निलेश पवार सर,शिक्षक प्रतिनिधी श्री.सचिन चव्हाण सर,कर्क भाऊसाहेब श्री.वाघ सर.

विद्यालयाच्या प्रयत्नाने शासनाकडून मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला मदत मिळाल्याने संस्थेचे चेअरमन डॉ.श्री.केदारजी थेपडे यांनी व माजी मुख्खाध्यापक श्री.पी.डी.पाटील सर,उपमुख्याध्यापक श्री.खोडपे सर,ज्यू.कॉलेज शिक्षक बंधू भगिनी तसेच माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी ,शाळेचे सर्व विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.

टीम झुंजार