जायंटस तेजस्विनी कडून दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Spread the love

जळगांव :- जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगाव तर्फे एक मदतीचा हात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संस्थापक अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांच्या संकल्पनेनुसार दिनांक ०१/१०/२०२२ शनिवार रोजी ठीक १२: ०० वाजता उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व प्रारंभिक बालविकास केंद्र जळगाव येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले म्हणून फुल आणि फुलाची पाकळी म्हणून दिव्यांगाना त्यांचे मानसिक मनोबल वाढविण्यासाठी शालेय साहित्य व त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू यांचे वाटप करण्यात आले.

उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात भेट दिली असता ह्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या केलेल्या उत्कृष्ट कामामुळे भारावलो.त्यांना अतिशय सुंदररित्या पणत्यांवरती रंगकाम करतांना पाहून खरोखर त्यांचा हेवा वाटू लागला. तसेच त्यांनी बनवलेले पुष्पगुच्छ अतिशय सुंदर मनोवेधक व अप्रतिम असे होते. ते पाहून या दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे की हे दिव्यांग विद्यार्थी सुद्धा इतका छान काम करतात.

उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र जळगाव हे जिल्ह्यातील एकमेव असे केंद्र आहे की जिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक मानसिक आर्थिक भौतिक अडचणी समजून घेऊन त्या सोडवले जातात व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी दिली जाते त्यांच्या पंखात बळ दिले जाते यासाठी त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी स्टॉप सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा आहे. या उपक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांचे विशेष आर्थिक सहकार्य लाभलेले असून उपक्रमाच्या प्रोजेक्ट चेअरमन त्या आहेत.

या विद्यार्थ्यांसोबत जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनीच्या पदाधिकारी व सदस्यांनी नृत्याचा आनंद घेतला.या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने कार्यक्रमाची सर्व तयारी केली. या प्रसंगी उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या संस्थापक हर्षाली चौधरी, संस्थापक अध्यक्ष सौ मनिषा पाटील तसेच अध्यक्ष श्रीमती ज्योती राणे, माधुरी शिंपी, नूतन तासखेडकर, किमया पाटील, नेहा जगताप संगिता चौधरी, जयश्री पाटील व इतर सदस्य महिला उपस्थित होत्या.

हे पण वाचा

टीम झुंजार