नगर तहसील कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते यांनी धुडगुस घातल्या प्रकरणी त़ोफखाना पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

Spread the love

माहिती अधिकारात माहिती उपलब्ध न दिल्याने हा प्रकार घडल्याचे वृत्त

नगर / प्रतिनिधी

नगर : 19 / उपनगरात टिव्ही सेंटर येथे प्रशासकीय इमारत आहे. याच ठिकाणी नगर तहसीलदार यांचे कार्यालय देखील याच ठिकाणी आहे. आज दि. 18 जानेवारी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान नगर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली मासिक आढावा व महसूल वसुली धोरणा‌ विषयी मिंटिग आयोजित करण्यात आली होती. या मिटिंगसाठी नगर तालुक्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत मिटींग चालू होती. दुपारी शाम नामदेव कोके रा . चाकण पुणे, त्यांचा मित्र सचिन एकनाथ ऐकाडे, रा . सारसनगर हे तहसील कार्यालय येथील मिटिंग हाॅल मध्ये मिटिंग सुरू असतानाच प्रवेश केला .

तहसीलदार साहेबांनी त्यांना मिटींग संपल्यानंतर भेटतो असे सांगितले पण सामाजिक कार्यकर्ते कोके व ऐकाडे यांनी बाहेर न जाताच तहसीलदार यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली मोठं मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.तलाठी मंडळ अधिकारी यांना बघु‌न घेतो अशी दमदाटीची भाषा केली .

तुम्ही भष्ट्राचारी आहात, भष्ट्राचाराची लागण झाली आहे.भिक मागा, एन्ट्री करप्शन ब्युरोकडे तक्रार देतो.तुरुंगात पाठवतो, तुम्ही बाहेर या तुमच्याकडे पाहून घेतो. अशा धमक्या दिल्या . शासकीय कार्यालयातील शांततेचा भंग केला.त्यावेळी दिपक व्यवहारे राळेगण तलाठी हे त्यांना समजावून सांगण्यास गेले . त्यावेळी कोके व ऐकाडे यांनी ढकलुन दिले व जास्त शहाणा बनु नको म्हणत राजेंद्र बेलकर यांना धक्काबुकी केली, मिंटिग हाॅल मधील खुर्ची लोटुन दिल्या.


या वेळी उपस्थित महिला तलाठी यांच्याकडे बोट करून अश्लिल शिविगाळ केली.त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने महिला कर्मचारी त्या ठिकाणी वरुन बाहेर पडल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला, शासकीय बैठक बंद पाडली तसेच तहसिल कार्यालय शांततेचा भंग केला.कोके यांनी मोबाईल वरून महसूल अधिकारी कर्मचारी भ्रष्ट आहे.तसेच व्हाटसओ स्टेटसला बदनामी मजकुर ठेवला होता.
अशा विविध आरोपाखाली खबर क्रमांक 0040 दि 18/01/2022 रोजी अधिनियम 1860 कलम 353,186,504,506,509,500,34 प्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तपास पोलिस निरीक्षक ज्योती चंद्रकांत गडकरी यांच्या कडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या घडामोडीकडे अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे लक्ष लागले आहे.

टीम झुंजार