शिवसेनेचं नवं चिन्ह काय असणार? मिलिंद नार्वेकरांनि ट्विट करत जाहीर केलं नाव आणि फोटो

Spread the love

मुंबई : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. अखेर या प्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला आता नाव वापरता येणार आहे पण चिन्ह वापरता येणार नाही. धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेचं नवं चिन्ह काय असणार अशा चर्चा सुरु असतानाच आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी नव्या चिन्हांबाबत सूचक संकेत दिले आहेत.

मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत आमचं चिन्ह म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हंटल आहे. यावेळी त्यांनी फोटोच्या मागील बाजूला वाघाचा लोगो ठेवला आहे. त्यामुळे शिवसेनेचं नवं चिन्ह वाघ असणार का असच चर्चाना उधाण आलं आहे. नार्वेकर यांच्या या ट्विटला अनेक लाईक्स आणि कॉमेंट्स मिळत आहेत.

पहा ट्वीट :

दरम्यान, धनुष्यबाण गोठवल्यांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणार असा एल्गार केला आहे. त्यामुळे आगामी लढाईसाठी ते सज्ज असल्याचे दिसते. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाला सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी पर्याय द्यावा लागणार आहे. त्यानुसार 3 चिन्हांची निवड करून निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार