तांदळी वडगावच्या धर्मनाथ मंदिर जीर्णोद्धाराचे काम होणार ऐतिहासिक वास्तु पध्दतीने
वडगाव तांदळी : १९ / नगर तालुक्यातील तांदळी वडगाव या ठिकाणी एकमेव नाथपंथी देवस्थान आहे. या देवस्थानचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. हे देवस्थान विशेष नावारुपाला येत आहे. हा देव नवसाला पावणारा म्हणून नगर तालुका प्रसिद्ध आहे. देवस्थानचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुक्या जनावरांना या ठिकाणी देवस्थान प्रदक्षिणा घातल्या नंतर मुक्या जनावरांचे अनेक आजार बरे होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. या धर्मनाथाची यात्रा श्रावण महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दरवर्षी भरत असते. या देवस्थानच्या यात्रेसाठी भक्तगण संपूर्ण जिल्ह्यातुन श्रद्धेपोटी या ठिकाणी भक्त मंडळी येत असतात .कोरोना मुळे गेल्या दोन वर्षांत यात्रा भरली नाही.
याच गावातील सुमन काशिनाथ धाडगे यांनी आपले पती सैन्य दलातुन निवृत झाल्यानंतर मिळालेली रक्कम स्वखुशीने एक रकमी नऊ लाख रुपए धर्मनाथ जिर्णोद्धार कामासाठी देणगी स्वरुपात दिले आहे.
या मंदिराचे काम पुरातन काळातील पध्दतीने होणार आहे . त्या बांधकामांचे आयुष्य साधारण तिनशे ते चारशे वर्षे असेल असं मत काम दिलेल्या कलाकारांनी या वेळी सांगितले. या ठिकाणी मोठं मोठे दगड आणुन त्यावर धारीव कोरीव नक्षीदार काम चालू आहे. हे आकर्षक देवस्थान वास्तु वर्षभरात उभी रहाणार आहे. या ठिकाणी अनेक भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर देणगी देत आहेत.या देवस्थानला एकुण ३२ एकर क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या उत्पन्नातुन देवस्थान चा दिवाबत्तीचा खर्च केला जातो. या ठिकाणी दर शनिवारी आमटी भाकर महाप्रसाद आयोजन केले जाते . देवस्थानाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भक्तगण येत असतो. या वेळी देणगीदार सुमन काशिनाथ धाडगे यांनी बोलताना सांगितले माझे पती कैलासवासी. मेजर काशिनाथ सावळेराम धाडगे यांच्या स्मरणार्थ म्हणून व धर्मनाथवर आमची मोठी श्रद्धा आहे त्यासाठी आम्ही देणगी देत आहोत
.
यावेळी सरपंच बाळासाहेब ठोंबरे, माजी सरपंच रमेश ठोंबरे, उपसरपंच वैभव मुनफन, संतोष घिंगे,राजु उबाळे,सोमनाथ पोकळे, माजी सरपंच विलास घिंगे, भैरवनाथ देवस्थान अध्यक्ष कराळे सर, ओम भारतीय महाराज, भिवसेन नाना घिंगे, संपत घिंगे , संपत मुनफन, रावसाहेब घिंगे, चांगदेव मुनफन, साहेबराव अबुले, विठ्ठल घिंगे, भिमराव घिंगे, संजय पवार, धर्मा साबळे, नवनाथ शिंदे, नामदेव आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.