श्रेयस अय्यरने भारताला सात गडी राखून विजय मिळवून दिला, मालिकेत १-१ बरोबरी

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : श्रेयस अय्यरने सामना १११ चेंडूत नाबाद ११३ धावांवर संपवला कारण त्याच्या शतकाच्या जोरावर रांचीमधील दुसऱ्या वनडेत भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट्सने विजय मिळवला. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत आता १-१ अशी बरोबरी साधली आहे,

निर्णायक तिसरा एकदिवसीय सामना मंगळवारी दिल्लीत होणार आहे. अय्यरने इशान किशनसोबत तिसर्‍या विकेटसाठी १६१ धावांची भागीदारी केवळ १५५ चेंडूंत केली. किशनला मात्र त्याच्या घरच्या मैदानावर पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आले नाही कारण तो ८४ चेंडूत ९३ धावांवर बाद झाला. तत्पूर्वी एडन मार्कराम (७९) आणि रीझा हेंड्रिक्स (७४) यांच्यामुळे दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ बाद २७८ धावा केल्या होत्या. 

मोहम्मद सिराजने १० षटकांत ३८ धावांत ३ गडी बाद केले, तर वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने भारताविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

हे पण वाचा

टीम झुंजार