राष्ट्रवादी व आठवले गटाच्या कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; पाच जणांवर गुन्हा दाखल.

Spread the love


पूर्णा(प्रतिनिधी)दि… पूर्णा शहरात सोमवार दि.१७ जानेवारी रोजी दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघेजन जखमी झाले असून, याप्रकरणी एका माजी नगरसेवकांसह पाच जणांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रारीवरून विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, मागील पंचवार्षिक नगर पालीका निवडणुकीत माजी नगरसेवक मधुकर गायकवाड व नागेश एंगडे यांच्या गटात निवडणूक झाली होती.या निवडणुकीत एंगडे यांचा पराभव झाला होता तेंव्हा पासून राजकीय आरोप प्रत्यारोप सूरुच होते.या आरोप प्रत्यारोपाची ठिकाणी सोमवारी मध्यरात्री कानडखेडनाका भिमनगर परीसरात पडली.फिर्यादी मिलींद दिगांबर सोनकांबळे,नागेश एंगडे व संदिप खरे हे तीघे घराकडे जात असताना आरोपी अजय मधुकर गायकवाड याने व त्यांचा मुलगा अजय गायकवाड यांनी त्या तीघांचा रस्ता अडवून अश्लील शिवीगाळ करत तू माझ्या वडीलांच्या विरोधात निवडणुकीत का काम करतोस या कारणावरून थापड बुक्यांनी मारहाण गंभीर जखमी केले.

सोन कांबळे यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन मारहाण करून काढून घेतली तर १७ हजार रुपये किमंतीचा मोबाईल हिसकावून घेतला.तर त्याच घटनास्थळी फिर्यादी मधुकर मारोतराव गायकवाड, माजी नगरसेवक आरोपी नागेश नामदेव एंगडे, संदिप खरे, मिलींद सोनकांबळे यांना तुम्ही माझ्या मुलास शिवीगाळ का केली,असे विचारत असताना आरोपी नागेश एंगडे व त्यांच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी पोटावर,तोंडावर मुक्का मार देत मारहाण केली.

अजय गायकवाड याच्या हातातील ५० हजार रुपये किंमतीची १ तोळा सोन्याची अंगठी हिसकावून घेतली.अशी फिर्याद दोन्ही गटांनी परस्पररित्या पूर्णा पोलिस ठाण्यात दिल्यामुळे वरील पाच जणांविरुद्ध कलम ३२७,२९४,३२३, ५०४,५०६,३४ भादवी प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून घटना घडताच पो.नि.सुभाष मारकड व साथिदारांनी आरोपी माजी नगरसेवक मधुकर गायकवाड, अजय गायकवाड, नागेश एंगडे,मिलींद सोनकांबळे यांना ताब्यात घेऊन गजाआड केले.

याप्रकरणी पो.निरीक्षक सुभाष मरकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार अर्जुन रणखांब हे पुढील तपास करीत आहेत.

वरील माहिती प्रतिनिधी कलिम सय्यद यांनी दिलेल्या वरून प्रसारीत करण्यात आली आहे.

टीम झुंजार