बाळासाहेबांनी छगन भुजबळांना मशालीवर निवडून आणलं, मशाल घेऊन भुजबळ म्हणाले होते…

Spread the love

मुंबई :- शिवसेनेला मिळालेलं मशाल चिन्ह त्यांना नवं आहे, असं अजिबातच नाहीये. मशाल आणि शिवसेनेचं नातं फार जुनं आहे. शिवसेना पूर्वी नोंदणीकृत पक्ष नव्हता. त्यामुळं शिवसेनेला १९८९ मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद अपक्ष म्हणून व्हायची. १९८५ साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत विजयी झाले होते. तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सेना पुरस्कृत पहिला खासदार देखील मशाल चिन्हावर निवडून आला होता. शिवसेनेची स्थापना जरी १९६६ साली झाली असली तरी १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. गेली ३३ वर्षे धनुष्यबाण शिवसेनेची ओळख होती. १९८९ नंतरच्या सर्व निवडणुका शिवसेनेने धनुष्यबाणावर लढवल्या. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेला धनुष्यबाणाचे चिन्ह पूरक असेच होते.

पण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला हादरा देऊन पक्ष फोडला. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर शिंदेंनी दावा सांगितल्यानंतर ठाकरेंनी त्यांच्या दाव्याला आव्हान दिलं. हा सगळा वाद पुढे न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या दारात गेला. निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला. आज दोन्ही गटांच्या पर्यायांचा विचार करुन निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर ‘मशाल’ चिन्ह दिलं. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिलं गेलंय. उद्यापर्यंत शिंदे गटाला चिन्हासंदर्भात प्राधान्यक्रम देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

तत्पुर्वी शिवसेनेला मिळालेलं ‘मशाल’ चिन्ह त्यांच्यासाठी अजिबातच नवं नाहीये. मशाल आणि शिवसेनेचं नातं फार जुनं आहे. शिवसेना पूर्वी नोंदणीकृत पक्ष नव्हता. त्यामुळं शिवसेनेला १९८९ मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद अपक्ष म्हणून व्हायची. १९८५ साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत विजयी झाले होते. तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सेना पुरस्कृत पहिला खासदार देखील मशाल चिन्हावर निवडून आला होता. आज शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर सेनेचे तत्कालिन नेते छगन भुजबळ यांचा एक फोटो व्हायरल होतोय. ज्यामध्ये डाव्या बाजूला भुजबळांचा फोटो आहे तर उजव्या बाजूला मशाल चिन्ह आहे. मुंबई महापालिका गाजवल्यानंतर विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या भुजबळांनी माझगावच्या मतदारांना आवाहन करताना मशालीसोबतचं पत्रक छापून लोकांना भावनिक साद घातली होती.

छगन भुजबळ म्हणाले होते….
शिवसेना प्रमुख, मा. बाळासाहेब ठाकरे यांनी १९७२ साली माझगांव विभागातून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मला उभे केले. जनतेने मला निवडूनही दिले. १९७८ साली महापालिकेची दुसरी निवडणूक झाली. पहिल्या पांच वर्षाच्या माझ्या कामाची पोचपावती म्हणून मतदार बंधु-भगिनींनी माझ्या मतांच्या पेटया भरभरुन टाकल्या आणि अनेक रथी-महारथी विरोधकांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. एवढे प्रेम व जिकाळा माझगांवच्या जनतेने मला दिला आहे. या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला.

हे पण वाचा

टीम झुंजार