ओम महिला मंडळाचा उल्लेखनीय उपक्रम
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १८/ करमाळा तालुक्यातील संक्रांतीचे वाण म्हणून दरवर्षी प्रमाणे इ १० वी च्या शिक्षणापर्यंतचा गरीब व हुशार मुलींचा शिक्षणाचा खर्च ओम महिला कला क्रिडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक प्रसारक मंडळ करमाळा. करीत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे महिला मंडळ अशी नाविन्यपूर्ण संक्रांत साजरी करत आहे.ही गोष्ट खरंच दखलपात्र आहे. करमाळा येथील हे महिला मंडळ म्हणजे जिजाऊ सावित्री रमाई चा वारसा चालवणारे मंडळ आहे. असे मत
डॉ कविता कांबळे यांनी मांडले.
मुलींनी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे रहावे.तसेच आर्थिक परिस्थिती भक्कम नसल्याने मुलींना १० वी पर्यंत चे शिक्षण घेणे ही शक्य होत नाही.काहींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते.म्हणून गेल्या सतरा वर्षांची ही शिक्षण दत्तक परंपरा खंडीत न पाडता सातत्याने आज ही सुरु ठेवली आहे.असे मत मंडळाच्या अध्यक्षा अंजली श्रीवास्तव यांनी प्रास्ताविकात मांडले.
या वर्षी इ ४ थी तील विद्यार्थ्यांनी निधी परदेशी( नामसाधना प्रा.शाळां करमाळा) तसेच नेहा माने इ ७ वी (जगताप विद्यालय करमाळा) यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
आज पर्यंत या मंडळाने सत्तावीस मुलींना शिक्षणासाठी साठी दत्तक घेऊन संक्रांतीचं अमूल्य असं वाण दिलं आहे.समाजासाठी हा कार्यक्रम बोधघेण्यासारखा आहे.या कोरोना काळात तर आयुष्य जगण्यासाठी लढा चालू आहे.ओम महिला मंडळाने आमच्या मुली शिक्षणासाठी दत्तक घेऊन आमचा भार हलका केला असे मत पालकांनी मांडले.
मुख्याध्यापिका जयश्रीताई वीर ,शहनाज मोमीन, महिला दक्षता समितीच्या उषा बलदोटा यांनी ही मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन मंडळाच्या ज्योती पांढरे यांनी केले. अलका यादव, दीपा मंडलेचा, पुष्पा लुंकड, बालिका यादव, सुनिता यादव यांनी स्वागत गित गायले. आभार रेशमा जाधव यांनी मानले.