दक्षिण आफ्रिकेला ७ गडी राखून पराभूत करून भारताने मालिका २-१ ने जिंकली

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मोहम्मद सिराजने नव्या चेंडूने सुरुवात केली तो भारताचा दबदबा असलेला शो होता. तो अभूतपूर्व होता आणि त्याने दोन लवकर बळी मिळवून भारताला आघाडी मिळवून दिली. दक्षिण आफ्रिकेला १०० च्या आत रोखले. फिरकीपटू नियमित अंतराने विकेट्स घेत राहिले. फिरकीपटू कुलदीप यादवने (४/१८), वॉशिंटन सुंदर (२/१५) आणि शाहबाज अहमद (२/३२) या फिरकी त्रिकूटाने आठ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनेही (२/१७) दोन गडी बाद केले. 

प्रत्युत्तरादाखल भारताने १९.१ षटकांत आवश्यक धावा पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने शिखर धवनला लवकर गमावले पण लक्ष्य जास्त नव्हते ज्यामुळे शुभमन गिलला त्याचे शॉट्स स्वातंत्र्याने खेळता आले. या प्रतिभावान सलामीवीराचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. शुबमन गिलने ५७ चेंडूत ४९ धावा केल्या. तर इशान किशनही मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला आणि तो १० धावांवर बाद झाला.

शेवटी, श्रेयस अय्यरनेच षटकार ठोकून भारतासाठी सामना आणि मालिका जिंकली. कुलदीप यादवला सामनावीर तर मोहम्मद सिराजला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
टी२० विश्वचषकाच्या सरावाच्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध १७ आणि न्यूझीलंड विरुद्ध १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार