झुंजार प्रतिनिधी पारोळा
प्रती तिरुपती श्री बालाजी महाराज यांच्या महाप्रसाद समितीला शहरातील प्रसिद्ध एका आचारीने आज एक लाख रुपयाची देणगी देऊन श्री बालाजी महाराज यांच्या प्रति भक्ती व्यक्त केली आहे.
श्री बालाजी महाराजांचा ब्रह्मोत्सवानिमित्त 14 ऑक्टोबर 22 रोजी महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे.
या महाप्रसादाचे हजारो भाविक हे दरवर्षी लाभ घेतात. तसेच श्री बालाजी संस्थान वतीने रोज 30 रुपयात पोटभर जेवण( महाप्रसाद) दिले जाते. त्याचे औचित्य साधून मूळ राजस्थान येथील रहिवासी व सध्या शहरात राहणारे घीसूलाल शंकरलाल वैष्णव या आचारीने बालाजी महाराजांच्या भक्तीपोटी आज महाप्रसाद समितीचे पदाधिकारी डॉ. अनिल गुजराथी, प्रकाश शिंपी, दिनेश गुजराती, दिलीप शिरोडकर, विश्वास चौधरी
किरण वाणी, संजय कासार, अमोल अमृतकर गुणवंत पाटील, प्रमोद शिरोळे आदी समिती सदस्य यांच्याकडे एक लाख रुपयाची देणगी सुपूर्द केली आहे. यापूर्वी देखील घीसूलाल वैष्णव यांनी महाप्रसाद समितीला शारीरिक श्रम व आर्थिक योगदान देऊन आपली भक्ती प्रकट केली आहे. त्यांच्या या दानशूर व्यक्तिमत्वाचे शहरातून कौतुक होत आहे.

हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम