जळगाव :- जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात शहरातील अलिशान भाग असलेल्या नवी पेठेतील एका इमारतीत सुरु असलेल्या हाय प्रोफाईल कुंटन खान्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी छापा टाकला आहे. गोलाणी मार्केटजवळ नवी पेठेतील वासुदेव बद्रीनाथ बेहर्डे यांच्या मालकीचे घर एका महिलेने भाड्याने घेतलेले आहे. या घरात रहिवास करण्यासह कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दोन ग्राहक पुरुष आणि ६ महिलांना ताब्यात घेतले आहे.
जळगाव शहरात अवैध कुंटनखाने अनेक ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असून पोलीस दादा सोपस्कररित्या दुर्लक्ष करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला होता. शहरातील गोलाणी मार्केट परिसरात असलेल्या एका खोलीत कुंटनखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यांनी केली कारवाई :
बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे व पथकाने छापा टाकला. एका कंपनीच्या नावे असलेल्या खोलीत कुंटनखाना सुरू होता. पोलिसांनी छाप्यात २ पुरुष आणि ६ तरुणी, महिलांना ताब्यात घेतले आहे. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून चौकशी सुरू आहे.
या पथकातील पोलीस कर्मचारी हे डमी ग्राहक बनून संबंधीत कुंटणखान्यात गेले. यानंतर येथे छापा टाकून सात जणांना अटक करण्यात आली आहे. यात कुंटणखान्याची मालकीण असणाऱ्या स्त्री सह पाच पहिला आणि एक ग्राहक यांचा समावेश आहे.
दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात कुंटनखाना सुरू असताना अद्याप पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही. कुंटनखान्यामागे कुणी राजकीय पदाधिकाऱ्याचा हात तर नाही? अशी शंका उपस्थित होत आहे.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.