धक्कादायक : पुण्यात मुलीकडून नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; मुलाची आत्महत्या ( Sextortion )

Spread the love

पुणे : – सध्या महाराष्ट्रात Sextortion चे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हाॅट्सअपवरून एका अनोळखी महिलेसोबत झालेल्या ओळखीतून न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी येऊ लागल्याने एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे.सेक्सटॉर्शन मुळे पुण्यातील धनकवडी येथील एका तरूणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अमोल गायकवाड असं या तरूणाचं नाव असून त्याला एका मुलीकडून नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी येत होती. त्याने पैसे पाठवूनही सतत मेसेज येत असल्याने अमोलने हे टोकाचे पाऊल उचलले आहे

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल गायकवाड या तरूणाला एक तरूणी सतत मेसेज करून त्याचे नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होती. त्यानंतर अमोलने तिच्या अकाऊंटवर साडेचार हजार रूपये पाठवले. त्यानंतरही तिने जास्तीच्या पैशाची मागणी केली होती.

तिने केलेल्या मेसेजनंतर अमोलने “मै सुसाईड करूंगा” असा परत मसेज तिला केला. त्यानंतरही तिने पैशाची मागणी केली आणि “करो सुसाईड” असा रिप्लाय केला. याच जाचाला कंटाळून त्याने घरात साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या व्हॉट्सअप नंबरवरून गुन्हा दाखल केला आहे. तर मुलीचा शोध लागला नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सेक्शटॉर्शनचा प्रकार सध्या वाढला असून यापासून सावधगिरी बाळगणे महत्त्वाचं आहे.

सेक्सटॉर्शन म्हणजे काय ?

हा प्रकार सध्या खूप वाढला आहे. एखाद्या सुंदर मुलीकडून फेसबुक रिक्वेस्ट पाठवली जाते. ती स्विकारल्यावर लगेच तिच्याकडून मेसेज येतात आणि व्हिडिओ कॉल करण्याची मागणी होते. व्हॉट्सअप नंबरही घेतला जातो. त्यानंतर व्हिडिओ कॉल येतो. त्यावेळी ती मुलगी नग्न असते. तरूणही याला मोहून व्हिडिओ कॉलवर बोलतात. पण त्यानंतर मुलीकडून हा कॉल रेकॉर्ड केला जातो आणि त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे वसूल करण्यात येतात. त्यामुळे या प्रकारापासून सावध राहणे गरजेचे आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार