जळगाव :- राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा परिषद भरतीबाबत महाजन यांची विद्यार्थ्यासोबत झालेले संभाषणाचे एक ऑडीओ क्लिप सध्या व्हायरल झाले आहे. या क्लिपमध्ये महाजन हे विद्यार्थ्यांसोबत अर्वाच्य भाषेत बोलताना दिसत आहेत. यामुळे आता महाजनांची मोठी अडचण होण्याचे चिन्हे दिसत आहेत.
एका तरुणानं नोकरी भरती विषयी मंत्री गिरीश महाजनांना फोन केल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. महाजन यांना फोन लावून तरुणाने म्हंटले की, “साहेब झेडपीची फाईल तुमच्याकडे आहे. तेवढं बघा ना सर. मुलं खूप डिप्रेशन आहेत.”यावर महाजन म्हणाले, तुम्हाला कामं नाहीत का रे काही. दिवसभरातून ५०० फोन करता. मी काही ते करत नाही. रद्द केली मी ते. “यानंतर विद्यार्थ्याने म्हंटले की, “अहो साहेब मुलं डिप्रेशनमध्ये आहे.” तर यावरही महाजन म्हणाले की, रद्द केले ते, ठेव फोन.
फोनवर संभाषण होत असताना महाजन यांनी अत्यंत अर्वाच्य आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. यामुळे आता महाजन यांच्यावर टीका होत आहे. यावर महाजन यांची प्रतिक्रीया अजूनही आलेली नाही. मात्र त्यांच्यावर विविध स्तरातून रोष व्यक्त होत आहे.
दरम्यान, ऑडियो क्लिपमध्ये संबंधित व्यक्ती विद्यार्थांना जिल्हा परिषद आरोग्य भरती रद्द केल्याचं सांगत आहे. जी परीक्षेचं काम न्यासाकडे होतं. परीक्षा पेपरफुटी घोटाळ्यानंतर परीक्षा लांबणीवर पडली होती. मात्र, नंतर परीक्षा कधी याचं स्पष्टीकरण मिळत नसल्याने परीक्षार्थी अस्वस्थ आहेत.
शिवाय पैसे आणि फॉर्म भरून वर्ष होत आलं तरी परीक्षा झालेली नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी मंत्र्यांना फोन केल्यानंतर हा प्रकार घडला असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडियो क्लिपची पुष्टी साम टीव्ही करत नाहीये.
पहा व्हिडिओ :
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.