प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- येथे लाड वंजारी समाज पंच मंडळातर्फे वंजारी समाजाचे दैवत श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक विकास नवाळे यांनी भूषवलेली तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे हे मान्यवर होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी लाड वंजारी समाजाचे अध्यक्ष विठ्ठल आंधळे यांनी आमदार निधीतून समाज मंगल कार्यालयजवळील जागेत विविध विकास कामे करून द्यावीत अशी मागणी चिमणराव पाटील यांचे कडे केली.
आमदार चिमणराव पाटील म्हणाले की लाड वंजारी समाजाचा विकासासाठी जे ही काम राहिले असेल ते मी पूर्ण करण्याच्या प्रयत्न करेल त्यासाठी मी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात विकास नवाळे श्री संत भगवान बाबा यांच्या कार्यास उजाळा दिला व बाबांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली.लाड वंजारी समाजाच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉ. देवेंद्र वंजारी, दशरथ चौधरी, चिंतामण पाटील, राजेंद्र ठाकूर धनंजय खैरनार, सुभाष मराठे, कृष्णा ओतरी, हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजाचे अध्यक्ष विठ्ठल आंधळे,बबन वंजारी, अक्षय वंजारी, प्रवीण वंजारी शिवाजी वंजारी, दीपक वंजारी, गोपाल वंजारी, विलास वंजारी, दामोदर वंजारी जितेंद्र वंजारी यांनी परिश्रम घेतले संचालन अक्षय वंजारी यांनी केले तर आभार विठ्ठल वंजारी यांनी मानले.