सामाजिक न्याय विभाग हा वंचितांना भारतीय संविधानाने दिलेले अधिकारांचा खरा संरक्षक व पहारेकरी- मा.निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील

Spread the love

जळगाव :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 90 वा वर्धापन दिन शनिवार दि. 15.10.2022 रोजी सकाळी ठिक 11.00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जळगांव येथे मा.श्री. राहुल पाटील निवासी उपजिल्हाधिकारी, जळगांव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अध्यक्षीय मनोगतात मा.श्री राहुल पाटील यांनी सामाजिक न्याय विभाग हा वंचितांना भारतीय संविधानाने दिलेले अधिकारांचा खरा संरक्षक व पहारेकरी असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते सामाजिक न्याय विभगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा (कर्तव्यपथ) या माहितीपर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मंचावर श्री.योगेश पाटील सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव, श्री. दत्तात्रय चौधरी, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, प्रा. गणेश सुर्यवंशी, एम.जे.कॉलेज, जळगाव उपस्थित होते.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमापुजनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिवस कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना श्री. योगेश पाटील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगांव यांनी समाज कल्याण विभागा अतंर्गत विविध सामाजिक कल्याणकारी व सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेपासून ते आजवरच्या ऐतिहासिक प्रवासावर प्रकाश टाकला. सदरील कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते प्रा. गणेश सुर्यवंशी यांनी त्यांच्या जीवनातील सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या घेतलेला लाभ व त्यामुळे त्यांच्या जीवनात झालेला बदल याविषयी आपल्या मनोगत मध्ये केला. तसेच विशेष करुन त्यांच्या शैक्षणिक जीवनात वसतिगृहाचे महत्त्व कसे अनमोल ठरले याबाबत देखील उल्लेख केला. तसेच प्रमुख व्याख्याते श्री. दत्तात्रय चौधरी, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ यांनी आपल्या मनोगतात समाज कल्याण विभागाचे आभार मानत तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत लाभ देत असून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी महत्त्वाची भूमीका बजावत असल्याचे सांगितले. श्री. राहुल पाटील निवासी उपजिल्हाधिकारी, जळगांव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सामाजिक न्याय विभागाच्या 90 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन, समाज कल्याण विभाग हा भारतीय संविधानाने दिलेले अधिकार सर्वसामान्यांना मिळवून देणारा खरा संरक्षक व पहारेकरी आहे, तसेच 1932 मध्ये छोटेसे रोपटे रुपाने सुरुवात झालेला समाज कल्याण विभाग आज वटवृक्षाप्रमाणे फुलतांना आपण पाहत आहोत असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमात शाहू महाराज परदेश शिक्षण शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपाली चंद्रमनी लभाने व विजय राजाराम सुरवाडे यांनी सिडनी युनिवर्सिटी (ऑस्ट्रेलिया) येथून चित्रफित पाठवून विभागाचे आभार मानत शुभेच्छा दिल्या. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचे लाभार्थी श्री. देविदास छगन निकम यांनी स्वत: कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांचे जीवनमानात कसा बदल झाला हे आपले मनोगत व्यक्त करतांना समाज कल्याण विभागाचे आभार व्यक्त केले. दिव्यांग व्यक्तींना शासकीय जमीन योजनेतील लाभार्थी श्री. महेंद्र सोनवणे यांनी लाभ मिळाल्यामुळे स्वत: व्यवसाय सुरु केल्याचे समाधान व्यक्त करत विभागाचे आभार मानले. तसेच सदर कार्यक्रमात 4 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिल पगारे, तालुका समन्वयक यांनी केले. स्वागत गीत मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलीचे शासकिय वसतिगृह जळगाव येथील विद्यार्थीनींनी केले, तर आभार प् कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे यांनी मानले.
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्हा जातपडताळणी कार्यालय व विविध महामंडळे यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी व तालुका समन्वयक यांनी परिश्रम घेतले.

टीम झुंजार