पाचोरा : – सध्या महाराष्ट्रात शीक्षकाला मारहाण झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील एका माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्याने शिस्तीत राहा, असे सांगणाऱ्या शिक्षकालाच शाळेच्या आवारात मारठोक करण्याची घटना घडली. मारहाण झालेल्या शिक्षकाने पिंपळगाव हरेश्वर पोलिसात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यास ताब्यात घेऊन त्यास समज देऊन अल्पवयीन असल्याने पालकांच्या स्वाधीन केले.पिंपळगाव हरेश्वर येथील अकरावीत शिकणारा एक विद्यार्थी शुक्रवारी (ता. १४) शर्टची वरील दोन बटन उघडे करून शर्टाच्या कॉलरला झटका देत तोंडात गुटखा चावत हातात लोखंडी चेन फिरवत शाळेच्या आवारात फिरत होता. या वेळी शाळेतील शिक्षकाने त्याला हटकले. जरा शिस्तीत राहा व विद्यार्थ्यासारखा वाग असे सांगितले.
त्याचा राग आल्याने विद्यार्थी शिक्षकाच्या अंगावर धावून गेला व शिक्षकाची कॉलर पकडून त्यांना शाळेच्या आवारातच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या गळ्यावर ओरबडले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर जवळच पडलेला लाकडी दांडा उचलून त्याने शिक्षकाच्या उजव्या पायावर व पाठीवर मारला.अचानक झालेला हा जीवघेणा हल्ला पाहून विद्यार्थ्यांची पळापळ झाली. इतर शिक्षक घटनास्थळी धावत आले व त्यांनी विद्यार्थ्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
परंतु विद्यार्थ्याने समजावण्यासाठी आलेल्या शिक्षकांनाही अश्लील शिवीगाळ करत तुम्ही बाहेर भेटा, असे धमकावत पळ काढला.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मारहाण झालेले शिक्षक प्रचंड गोंधळले. इतर शिक्षकही भयभीत झाले. त्यांनी संबंधित शिक्षकांना मानसिक धीर दिला व पोलिसात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल केला व पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले व त्याला समज देऊन पालकांच्या स्वाधीन केले.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम